ETV Bharat / state

एकनाथ खडसे नाराज नाहीत, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव येईल - दानवे - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

एकनाथ खडसे नाराज नसून, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होणार असल्याची शक्यता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे
author img

By

Published : Oct 2, 2019, 11:31 AM IST

औरंगाबाद - सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अद्यापही सर्व ठिकाणचे उमेदवार जाहीर करताना दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवार नसल्याने ते मिळेल त्याला तिकिट देतील, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. तसेच एकनाथ खडसे नाराज नसून, दुसऱ्या यादीत त्यांचे नाव जाहीर होणार असल्याची शक्यता दानवे यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे नाराज नाहीत - रावसाहेब दानवे

एकनाथ खडसे नाराज नाहीत. पहिल्या यादीत नाव आले नसले तरी पुढील दोन दिवसात जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचे नाव असू शकते असा अंदाज दानवेंनी व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी दानवे बोलत होते. एकेकाळी दोन खासदार असणारा पक्ष आता मोठा झाला आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीचे दररोज कोणीतरी राजीनामा देत आहेत. पक्षातील निष्ठावंतांना न्याय देणार असल्याचेही दानवे म्हणाले. सर्वात जुना असलेला पक्ष काही वर्षात संपेल असे वाटत असल्याचे दानवे म्हणाले. तिकीट वाटपवरून काही जण नाराज होतील मात्र बंडखोरी कोणीही करणार नाही, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

Intro:सर्व पक्ष आप आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करीत आहेत. मात्र काँग्रेस - राष्ट्रवादी आपली उमेदवारी यादी जाहीर करतांना दिसत नाही. कारण यांच्याकडे उमेदवार शिल्लक राहिले नाहीत. उमेदवार मिळाले नाहीत तर मिळेल त्याला तिकीट देतील अशी टीका केंद्रीय राज्य मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली.
Body:एकनाथ खडसे नाराज नाहीत. पहिल्या यादीत नाव आलं नसलं तरी पुढील दोन दिवसात जाहीर होणाऱ्या यादीत त्यांच नाव असू शकत असा अंदाज रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उदघाटन करण्यात आले.Conclusion:एकेकाळी दोन खासदार असणारा पक्ष आता मोठा झालाय. काँग्रेस राष्ट्रवादीचे रोज कोनीना कोणी राजीनामा देत आहेत. सकाळी माझ्याकडे दोन जण आले आणि विचारलं तिकीट वाटपात आमचं काय पण मी नाही म्हणून सांगितलं, कारण पक्षातील निष्ठवंतांना देखील न्याय द्यावा लागेल. सर्वात जुना असलेला पक्ष काही वर्षात संपेल अस वाटत अशी टीका देखील रावसाहेब दानवे यांनी केली. तिकीट वाटपवरून काही जण नाराज होतील मात्र बंडखोरी कोणीही करणार नाही असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

बाईट रावसाहेब दानवे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.