ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये ई-चालानप्रणाली लागू; एटीएम कार्डद्वारे भरा वाहतुकीचा दंड - e challan app aurangabad

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून वसूल करण्यात येणारा दंड आता एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे घेतला जाणार आहे. यामुळे वाहतूक विभागाच्या कारभारामध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. या सुविधेसाठी महा ट्रफिक अॅप तयार करण्यात आले आहे.

ई-चालानप्रणाली
author img

By

Published : Apr 2, 2019, 5:37 PM IST

औंरंगाबाद - वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून वसूल करण्यात येणारा दंड आता एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे घेतला जाणार आहे. वाहतूक विभागाच्या कारभारामध्ये पारदर्शकता यावी आणि जमा केलेल्या दंडाबाबतचा तपशील साठवून रहावा यासाठी ई-चालान पद्धत मंगळवारपासून शहरात सुरू करण्यात येत आहे. यासाठी १०० मशीन शहर पोलिसांना दिल्या आहेत.

ई-चालानप्रणाली

अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वाहनचालकांकडून पावतीद्वारे दंड वसूल करण्यात येतो. तसेच वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊनही दंडाची रक्कम भरता येते. दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतर वाहतूक विभागाकडून गाडी सोडण्यात येते किंवा जप्त केलेले लायसन्स परत करण्यात येते. यामध्ये वाहनचालकांचा बराच वेळ वाया जातो. वाहनचालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात यावरुन वादही होतात. त्यामुळे अनेक वेळा नियम मोडणाऱ्या व्यक्तींचा फोटो काढून दंडाची पावती वाहनचालकांच्या पत्त्यावर पाठविली जाते. हा दंड वाहन चालकाकडून बँकेत भरला जात होता. या जुन्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

दंड भरण्याची व्यवस्था अधिक जलद आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने पोलीस वाहतूक विभागाने ई-चालान नावाची यंत्रणा उभी केली आहे. त्यामध्ये वाहनचालकाला जागेवरच एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वरूनही दंड भरता येणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस विभागाला १०० मशीन देण्यात आल्या आहेत. शहरात वाहतूक विभागाचे ५ उपविभाग आहेत. या पाच विभागात प्रत्येकी २० मशीन देण्यात आल्या आहेत.

नियम मोडणाऱ्या वाहन चालकाला पकडल्यानंतर वाहतूक पोलीस गाडीचा क्रमांक, लायसन्स क्रमांक, वाहतूक दिनांक, वेळ आणि कोणता नियम मोडला याबाबतची इत्यंभूत माहिती सॉफ्टवेअरमध्ये नमुद करणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

Intro:वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाकडून वसूल करण्यात येणारा दंड आता एटीएम, डेबिट ,क्रेडिट कार्ड द्वारे घेतला जाणार आहे कारभारामध्ये पारदर्शकता यावी आणि दंडा बाबतची माहिती साठवून रहावी यासाठी ई चालान नावाची नवीन पद्धत आजपासून औरंगाबाद शहरात सुरू करण्यात येत आहे यासाठी 100 मशीन पोलिसांना प्राप्त झाल्या आहे.

Body:शहरातून वाहने चालविताना अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात अशा वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येतो चालकाला दंडाची पावती दिली जाते.व त्यानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात जाऊन दिलेल्या पावतीचा दंड भरावा लागतो. दंड भरल्याची पावती दाखविल्यानंतर वाहतूक विभागाकडून गाडी सोडण्यात येते किंवा जप्त केलेले लायसन्स परत करतात यामध्ये वाहनचालकांचा बराच वेळ वाया जातो. वाहनचालक आणि वाहतूक पोलिस यांच्यात वाद होत असल्याने नियम मोडणाऱ्या व्यक्तींचा फोटो काढून त्यानंतर दंडाची पावती वाहनचालकांच्या पत्त्यावर पाठविली जाते. हे दंड वाहन चालकाकडून बँकेत भरला जात होता. या व्यवस्थेमध्ये अधिक सुधारणा करण्यात आली आहे. दंड भरण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने पोलीस वाहतूक विभागाने इ चालान नावाची यंत्रणा उभी केली आहे. त्यामध्ये वाहनचालकाला जागेवरच एटीएम कार्ड, डेबिट कार्ड,क्रेडिट कार्ड वरूनही दंड भरता येणार आहे यासाठी वाहतूक पोलिस विभागाला शंभर मशीन प्राप्त झाल्या आहेत शहरात वाहतूक विभागाचे पाच उपविभाग आहेत या पाच विभागात प्रत्येकी वीस मशीन देण्यात येणार आहे महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस या मशीन घेऊन उभे राहणार आहेत

Conclusion:नियम मोडणाऱ्या चालकाला पकडल्यानंतर वाहतूक पोलीस त्याच्यासारखा चे संपूर्ण नाव गाडीचा क्रमांक लायसन्स क्रमांक वाहतूक नियम मोडण्याचा दिनांक ठिकाण वेळ आणि कोणता नियम तोडला हे नमूद करणार आहेत ही संपूर्ण माहिती ही चालान सॉफ्टवेअर मध्ये सेव्ह होणार आहे त्यामुळे एखाद्या वाहन चालकाने कितीवेळा वाहतुकीचे नियम तोडले की तिचा दंड भरला हे एका क्लिकवर समजणार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.