ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर आली बेघर होण्याची वेळ - औरंगाबाद लेटेस्ट न्यूज

मागच्या आठवड्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्या दालनाचे छत कोसळले. त्यामुळे सामान्य प्रशासन, वित्त विभाग व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दालने रिकामी करण्यात येणार आहेत. हा विभाग घाटीसमोरील जि.प.च्या निवासस्थानांमध्ये हलविण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद औरंगाबाद
जिल्हा परिषद औरंगाबाद
author img

By

Published : Apr 25, 2021, 10:47 PM IST

औरंंगाबाद - जिल्हा परिषदेच्या इमारतीचे छत कोसळल्यामुळे ती इमारत खाली करण्याची तयारी सुरू करण्यात आली असून,यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची घाटीसमोर असलेली निवासस्थाने तत्काळ रिकामी करण्याचे आदेश जि.प. प्रशासनाने काढले असून, बांधकाम विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिस बजावल्या आहेत.

मागच्या आठवड्यात दालनाचे छत कोसळले

जिल्हा परिषदेची ऐतिहासिक इमारत मोडकळीस आली असून, वरचेवर छत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मागच्या आठवड्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांच्या दालनाचे छत कोसळले. त्यामुळे सामान्य प्रशासन, वित्त विभाग व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दालने रिकामी करण्यात येणार आहेत. हा विभाग घाटीसमोरील जि.प.च्या निवासस्थानांमध्ये हलविण्याचा निर्णय नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

किमान ६ महिन्यांची मुदतवाढ द्यावी

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेजवळील ८ निवासस्थाने तत्काळ रिकामी करण्याचे फर्मान काढले आहे. तसे नोटिस संबंधितांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा काळ असताना आणि कडक निर्बंध असताना निवासस्थाने रिकामी करून आम्ही जायचे कुठे? असा सवाल संबंधित कर्मचाऱ्यांनी केला असून, आम्हाला किमान ६ महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले यांच्याकडे केली आहे.

पोलीस कारवाईचा तोंडी इशारा

या आवारातील ४ ते ५ निवासस्थाने रिकामी असून, ती संबंधितांनी द्यावीत, असे बांधकाम विभागाचे मत आहे. परंतु या निवासस्थानांची बिले मोठ्या प्रमाणावर थकलेली असून, त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यांची बिले अदा करून दुरुस्ती करून द्या, आम्ही ती घेऊ परंतु सद्यपरिस्थितीत घरे रिकामी करून आम्हाला रस्त्यावर आणू नका, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे संबंधितांनी निवासस्थाने रिकामी केली नाहीत तर पोलीस कारवाईचा तोंडी इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी घाबरले असून, त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.