ETV Bharat / state

'नासा'चा तोतया घरीच बनवायचा कागदपत्रे ; पोलिसांनी जप्त केले साहित्य

अभिजीत पानसरे हा, आपण आयपीएस अधिकारी असून रॉसाठी काम करत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षित असलेला पानसरे इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. २०१६ मध्ये औरंगाबाद योथील रहिवासी शरद गवळी यांची पानसरेसोबत अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती.

'तो' नासाचा तोतया घरीच बनवायचा कागदपत्रे

author img

By

Published : Jan 17, 2020, 5:21 PM IST

औरंगाबाद- देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या 'रॉ'चा अधिकारी असल्याच्या थापा मारून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अभिजीत पानसरे, असे या तोतया रॉ अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच अंतराळ संस्था नासा व पंतप्रधान कार्यालयाचे बनावट कागदपत्रे व कलर प्रिंटर असे अनेक साहित्य हस्तगत केली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नासाचा तोतया घरीच बनवायचा कागदपत्रे

अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून रॉसाठी काम करत असल्याच्या थापा मारत होता. उच्चशिक्षित असलेला पानसरे इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. २०१६ मध्ये औरंगाबाद योथील रहिवासी शरद गवळी यांची पानसरेसोबत अ‍ॅड. नितीन भवर यांच्या मध्यस्थीने ओळख झाली होती. त्यानंतर पानसरे याने नासाच्यावतीने आपल्याला न्यूक्लीयर रिअ‌ॅक्टर तयार करण्याचे कंत्राट मिळाले असल्याचे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासवले. त्यावेळी पानसरे याच्यासोबत दोन सहकारी महिला देखील होत्या.

हेही वाचा - पेट्रोल-डिझेलच्या दरात दुसऱ्या दिवशीही कपात; जाणून घ्या, आजचे दर

अभिजीत पानसरे याच्यावर विश्वास ठेवून शरद गवळी यांनी पानसरेच्या प्रकल्पात ऑक्टोबर २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात २ कोटी ५० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर पानसरे हा गवळी यांना परतावा देण्यास टाळाटाळ करत होता. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर गवळी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पानसरे याला अटक करण्यात आली आहे. पानसरेवर नाशिक येथे देखील गुन्हा दाखल आहे.

कोठडीत असताना पानसरेकडून पोलिसांनी पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र, बनावट चेक, नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेचे बनावट पत्र असे अनेक महत्वाचे कागदपत्रे व हे कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरात असलेला प्रिंटर पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

Intro:नासाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणारा रॉ चा तोतया आधीकारी पंतप्रधान कार्यालय, अंतराळ संस्था नासा तसेच अनेक बनावट कार्यालयाचे कागदपत्रे घरीच करायचा तयार..
पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती..

Body:देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ चा अधिकारी असल्याची थाप मारून औरंगाबादेत अनेकांना कोट्यावधी रूपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या एका भामट्याच्या आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अभिजीत पानसरे असे तोतया रॉ च्या अधिकारयाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी आयपीएस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र,तसेच अंतराळ संस्था नासा व पंतप्रधान कार्यालयाचे बनावट कागदपत्रे व कलर प्रिंटर असे अनेक साहित्य पोलिसांनी हस्तगत केली आहे. अशी माहिती पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अभिजीत पानसरे हा आपण आयपीएस अधिकारी असून देशातील सर्वात मोठी गुप्तचर संस्था असलेल्या रॉ साठी काम करीत असल्याची थाप मारत होता. उच्चशिक्षीत असलेला पानसरे हा हाय-फाय इंग्रजीत बोलून समोरच्या व्यक्तीवर छाप पाडत होता. औरंगाबादमधील रहिवासी शरद किसनराव गवळी यांना पानसरे याने आपण रॉ चे अधिकारी असून नासाच्या वतीने आपल्याला न्युक्लीयर रियाकटर तयार करण्याचे कंत्राट मिळाले आहे असे सांगितले. त्यासाठी पानसरे याने गवळी यांना नासाची बनावट कागदपत्रे, बनावट धनादेश दाखवून ते खरी असल्याचे भासविले होते. व दोन कोटींची फसवणूक केली होती. कोठडीत असताना पानसरे कडून पोलिसांनी पंतप्रधान कार्यालयाचे बनावट पत्र, बनावट चेक, नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थेचे बनवतात पत्र असे अनेक महत्वाचे कागदपत्रे व हे कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरात असलेला प्रिंटर पोलिसांनी जप्त केला आहे.अशी माहिती आज पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्तांनी दिली आहे..

बाईट...
चिरंजीव प्रसाद,
पोलीस आयुक्त, औरंगाबादConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.