औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी ड्रोन कॅमेरे कन्नड पोलिसांना वापरण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
प्रशासनाने अनेक उपाययोजना करून,पोलिसांनी कडक भूमिका घेऊनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. पोलीस रऊंडवर आले की नागरिक घरात पळून जातात. पोलीस गेले की, परत बाहेर येणारे व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होणार असून नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन बाबासाहेब मोहिते व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे यांनी केले आहे.
यानंतर पोलीस ताफ्याने शहरातील सिद्दीक चौक, बडा बंगला, बाजार गल्ली, माळीवडा आदी भागात ड्रोन कॅमेरासह फेरी मारून नागरिकांना सदर बाब लक्षात आणून दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे,बाबासाहेब मोहिते,वाल्मिक लोखंडे,विक्रम पाटे, विक्रम चव्हाण,आरेफ हश्मी,कॅमेरा ऑपरेटर प्रशांत वाघ,पोलीस राजेंद्र मुळे, गजानन करहाळे, गणेश गोरक्ष,कैलास करवंदे उपस्थित होते.