छत्रपती संभाजीनगर : DRI Busts Narcotics Factory : अहमदाबाद DRI आणि अहमदाबाद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले. रविवारी सकाळपासून हे छापासत्र सुरू होते. कांचनवाडी येथून एका आरोपीच्या घरातून 23 किलो कोकेन, 3 kg मेफेड्रोन आणि 30 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तर जितेशकुमार हिनहोरिया आणि संदीप कुमावत यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Narcotics Seized in Chhatrapati Sambhajinagar)
छाप्याचा संबंध गुजरातमधील कारवाईशी : पैठण एमआयडीसीमध्ये महालक्ष्मी इंडस्ट्री या कारखान्यात अंमली पदार्थांचे उत्पादन सुरू होते. या कारखान्यातून 4.5 Kg मेफोड्रोन, 4.3 Kg केटामाईन आणि मेफोड्रोनचे एक मिश्रण ज्याचे वजन 9.3 किलो होते ते जप्त करण्यात आले. बाजार मूल्यानुसार हे सगळे अंमली पदार्थ 250 कोटींच्या घरात होते. NDPS Act, 1985 नुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी ताब्यात : दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी गुजरातचे होते आणि गुजरातमध्ये जो अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता, त्याच्याशी या छाप्याचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सध्या तपास यंत्रणा याबाबत माहिती देत नाही. तपास पूर्ण झाल्यावर याबाबतची अधिक माहिती देता येईल, असे सांगण्यात आले आहे.
गुजरात येथून येत होते अंमली पदार्थ? : मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरात गुजरात मार्गे अंमली पदार्थ दाखल होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत मोठा साठा जप्त केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. शहरात आलेले अंमली पदार्थ वेगवेगळ्या भागात पाठवण्यात येत होते. यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: