औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उर्वरित परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा ३ मे तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून होणार आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
पदव्युत्तर परीक्षा ५ मे पासून -
दरम्यान, महाराष्ट्र शासनाने १५ मार्चपासून विविध निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभुमीवर १५ ते ३० एप्रिल होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर पुढे ढकलण्यात आले. आता तीन मेपासून उर्वरित पेपर घेण्यात येणार आहेत. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून सुरू होणार आहे. उर्वरित ऑनलाइन पद्धतीने त्यामुळे आयटी कॉर्डिनेटरची संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. आपल्या महाविद्यालयातील कोणीही विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यायची आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा व भवितव्य महत्त्वाचे : कुलगुरू
सलग दुसऱ्या वर्षीच्या उन्हाळ्यात परिस्थिती कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे असल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होत आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची असून त्यांचे भवितव्य देखील महत्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा, वेळेत निकाल व लवकर सत्र सुरू करणे गरजेचे आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांचे तांत्रिक अडचणीमुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहनही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे.