ETV Bharat / state

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर, कारण अस्पष्ट

author img

By

Published : Jun 28, 2023, 10:50 PM IST

मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या अप्पर सचिवांनी त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आहे. येत्या 2 जुलै रोजी केंद्रेकर यांना निरोप देण्यात येईल.

सुनील केंद्रेकर
सुनील केंद्रेकर

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - राज्यभर गाजलेल्या आय.ए.एस अधिकारी तथा मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या अप्पर सचिवांनी त्यांच्या विनंतीला मान्यता दिली आहे. येत्या 2 जुलै रोजी केंद्रेकर यांना निरोप देण्यात येईल. मात्र सर्वसामान्यांमध्ये केंद्रेकरांसारख्या चांगल्या अधिकाऱ्याने हा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न पडला आहे. मागे शेतकऱ्यांसाठी केलेली शिफारस किंवा राजकारणात सक्रिय होणार का? अशा शक्यता वर्तवल्या जात आहे.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात स्वेच्छानिवृत्ती साठी अर्ज केला होता. त्या अर्जाला अप्पर मुख्य सचिवांनी मंगळवारी मान्यता दिल्याचे पत्र काढले आहे. त्याबाबत शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला माहिती दिली. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्रेकरांच्या स्वेच्छानिवृत्तीवर आक्षेप नाही. मात्र त्यांना एक नागरीक म्हणून पाणी पुरवठा योजनेत सहकार्य करण्याची विनंती करता येईल, असे निर्देश दिले.

कोण आहेत सुनील केंद्रेकर? - राज्यातील जनसामान्यांमध्ये वेगळी छाप सोडणारे अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकर प्रचलित आहेत. याआधी विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त आणि सध्या विभागीय आयुक्त पदावर त्यांनी काम केले आहे. शिस्तप्रिय अधिकारी, अधिकाऱ्यांवर वचक असलेले अधिकारी म्हणून त्यांचे नाव नेहमी चर्चेत राहिले. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना त्यांची अचानक बदली झाली असताना जिल्ह्यातील नागरिक बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर आले होते.

निर्णयामुळे चर्चा रंगल्या - सुनील केंद्रेकर यांच्या निवृत्तीला अद्याप अडीच वर्षे बाकी आहेत. मात्र त्यांनी अचानक सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला. त्यात अनेक चर्चा रंगत आहेत. ज्यामधे आगामी निवडणूक पूर्वी एखाद्या पक्षात प्रवेश करून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट मानली जाते. शेतकरी आत्महत्या वाढत जात असल्याने सुनील केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी सर्व्हे सुरु केला होता. त्यात खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातील पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. त्याबाबत रिपोर्ट सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर त्यांना काही जणांनी जाणीवपूर्वक त्रास दिल्याची चर्चा विभागीय आयुक्तालयात रंगली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.