ETV Bharat / state

कोरोना रुग्णांना ईद व अक्षय्य तृतीयेनिमित्त आमरसाची मेजवानी

आज सर्वत्र रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे सण साजरे होत आहेत. पण कोरोनामुळे रूग्णालयातील रूग्णांना आमरसाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे औरंगाबाद येथील इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनने रूग्णांसाठी आमरसाचे जेवण दिले. जवळपास 1650 जणांना आमरसाची मेजवानी देण्यात आली.

Aurangabad
औरंगाबाद
author img

By

Published : May 14, 2021, 5:14 PM IST

औरंगाबाद - रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे सण आज (14 मे) एकत्र आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या सणाचा सर्वजण आनंद घेत आहेत. पण रूग्णालयातील कोरोना रूग्णांना याचा आनंद घेता येत नाही. शिवाय आमरसही मिळत नाही. त्यामुळे आपल्या घरासारखं जेवण मिळावं यासाठी औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी आमरसाची मेजवानी देण्यात आली. इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनतर्फे आमरसाची सोय करण्यात आली.

औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांना ईद व अक्षय्य तृतीयेनिमित्त आमरसाची मेजवानी

300 किलो आंब्यांचा रस

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 6991 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी शासकीय रुग्णालय आणि कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सणानिमित्त विशेष भोजनाची सोय इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनतर्फे करण्यात आली. या जेवणात आमरस, शेवया, भात, भाजी, बाकरवडी हे पदार्थ देण्यात आले. त्यासाठी 300 किलो आंबे आणि साडेतीनशे शेवयांचे पॅकेट्स वापरण्यात आले. याबाबतची माहिती अन्नामृत फाऊंडेशनचे शाखा व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे यांनी दिली.

इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशन देतेय एका वर्षांपासून जेवण

मार्च 2020पासून राज्यात कोरोनाने शिरकाव करायला सुरुवात केली. औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल 2020पासून कोरोना रुग्ण आढळून यायला सुरुवात झाली. कोविड सेंटर सुरू झाल्यावर तिथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना जेवण पुरवण्यासाठी इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनने पुढाकार घेतला. मागील वर्षभरात 10 लाख कोविड रुग्ण, आरोग्य कर्मचारी आणि गरजूंना भोजन देण्यात आले, असेही सुदर्शन पोटभरे यांनी सांगितले.

अनेक स्वयंसेवक देतात सेवा

'अन्नामृत फाऊंडेशन गेल्या वर्षभरापासून सेवा देत आहे. यात अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत. यामध्ये नामांकित कंपनीत काम करणारे इंजिनियर, सामाजिक संस्था, महिला संघटनांचा समावेश आहे. ते स्वयंस्फूर्तीने सेवा देत आहेत. त्यांच्यामुळे रुग्णांना सेवा देणे शक्य झाले असून आज सण असला तरी महिलांनी सकाळपासूनच संस्थेत आपला सहभाग नोंदवला. सकाळी 8 वाजल्यापासूनच आमरस करण्यासाठी महिला आल्या होत्या. आपल्या घरचा सण असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याने त्यांचे कौतुक करायला हवे', अशी भावना सुदर्शन पोटभरे यांनी व्यक्त केली. तर, 'येथे गरजूंसाठी भोजन दिले जाते. त्यामुळे काम करत असताना वेगळेच समाधान मिळते', असे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या सामाजिक कार्यकऱ्यांनी सांगितले.

आमदार सावेंनीही भरला डब्यात आमरस

भाजपा आमदार अतुल सावे यांनी आज इस्कॉन अन्नामृत फाऊंडेशनला भेट दिली. त्यावेळी रुग्णांसाठी आमरस डब्यांमध्ये भरण्याचे काम सुरू होते. अतुल सावे यांनी क्षणाचाही विलंब न करता आमरस भरण्याचे काम हाती घेतले. जवळपास अर्धातास त्यांनी आमरस डब्यांमध्ये भरण्याचे काम केले.

येथे देण्यात आले आमरसाचे जेवण

  • सिपेट सेंटर - 200 डबे
  • MIT सेंटर - 220 डबे
  • करुणा प्रकल्प - 100 डबे
  • कामगार चौक - 100 डबे
  • कॅन्सर हॉस्पिटल - 100 डबे
  • घाटी रुग्णालय - 70 डबे
  • सेवांकूर - 15 डबे
  • ESIC हॉस्पिटल - 20 डबे
  • सेवाभावी संस्था - 800 डबे
  • मुलींचे वासतिगृह - 25 डबे
  • असे एकूण 1650 जणांना आमरसाचे भोजन देण्यात आले.

हेही वाचा - 'मालवाहू वाहन चालकांना आरटीपीसीआरची अट रद्द करा; अन्यथा चक्काजाम'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.