औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (gram panchayat election) लागायला सुरुवात झाली आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर जल्लोषात बाहेर पडतो. त्यावेळी व्यवसायिकाची चांदी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ढोल पथक, हार आणि गुलाल बाजारभावापेक्षा पाचपटीने अधिक महाग विक्री केली जात आहे. मात्र विजयी उमेदवार आनंदात मिळेल, त्या भावात या गोष्टींची खरेदी करत आनंदोत्सव साजरा करताना पाहायला मिळत (flower necklaces and gulal become expensive) आहे.
हार शंभर रुपयांना : उमेदवार विजयी झाला की सर्वात पहिले त्याच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यासाठी हार घेतले जातात. निवडणूक अनिश्चित असते. त्यामुळे पहिलेच कोणीही हार विकत घेऊन ठेवत (occasion of gram panchayat election result) नाही. मात्र जसा निकाल लागला, तशी सर्वात पहिले हाराची गरज पडते. त्यामुळे हडको भागातील होमगार्ड मैदानाजवळ हार विक्रीचे काही दुकान छाटण्यात आले आहेत. उमेदवार विजयी झाला की, त्याचे समर्थक तिथून हार विकत घेऊन जिंकणाऱ्या व्यक्तींच्या गळ्यात घालत आहेत. मात्र आज हारांच्या किमतीला सोन्याचा भाव आला आहे. कारण बाजारात पंधरा ते वीस रुपयाला मिळणारा हार इथे चक्क शंभर रुपयाला विकला जात आहे. कोणी दोन, तर कोणी पाच पाच हार घेऊन विजयी उमेदवारांचा गळ्यात घालत आहे. याबाबत हार विक्रेत्यांना विचारला असता आजचे काही तासच आम्हाला भाव आहे. त्यानंतर आम्हाला कोण विचारणार ? अशा पद्धतीने व्यावसायिकांनी उत्तर (Dhol pathak flower necklaces and gulal) दिले.
गुलालाची उधळण महागली : उमेदवार विजयी झाला की, त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यात गुलाल महत्त्वाचा ठरतो. विजय गुलाल उधळण्यासाठी सर्वच पुढे येत असतात. त्यामुळे निवडणूक मतमोजणी केंद्राजवळ गुलालाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. हातात 10 किलो, २० किलो अशी पोती घेऊन व्यावसायिक गुलालाची विक्री करताना आढळून येत आहेत. छोटी गोणी 300 रुपयाला तर मोठी गोणी 500 रुपयाला या दराने गुलालाची विक्री केली जात आहे. याला सिमेंटपेक्षा गुलाल महाग अशी म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र हौसेला मोल नसते, असे म्हणतात. उमेदवार विजयी झाला की आनंद इतका वाढलेला असतो की, त्यावेळेस महाग का होईना मात्र गुलाल उधळाला मिळतो, यातच आनंद व्यक्त केला जात (Gulals Become Expensive) आहे.
ढोल पथक खातोय भाव : उमेदवार विजयी झाल्यानंतर ढोल वाजवत जल्लोष केला जातो. मात्र प्रत्येक गावांमध्ये हा जल्लोष मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना निकाल लागणार, त्या ठिकाणी मात्र काही ढोल पथकांनी तात्पुरती सोय उपलब्ध करून दिली आहे. एक दोन मिनिट आनंद व्यक्त करण्यासाठी ढोल वाजवण्यासाठी पाचशे ते हजार रुपये घेत आहेत. मात्र आनंदपुढे पैश्यांची काय मोल ? म्हणत विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते पैसे मोजण्यास तयार असल्याचे पाहायला मिळाले.