ETV Bharat / state

Dewai Cooperative Society Scam : आदर्शनंतर आणखी एका पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटाळा, फरार झालेल्या संचालकावर गुन्हा दाखल - पतसंस्थेचे संचालक महादेव काकडे

Dewai Cooperative Society Scam : देवाई महिला नागरी पतसंस्थेत तब्बल 31 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आलाय. याप्रकरणी शहरातील सातारा पोलीस ठाण्यात पतसंस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dewai Cooperative Society Scam
Dewai Cooperative Society Scam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 7:20 AM IST

आदर्श नंतर आणखी एका पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Dewai Cooperative Society Scam : छत्रपती संभाजीनगरात आदर्श नागरी पतसंस्थेत 202 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं प्रकरण ताजं असतानाच शहरात आणखी एका पतसंस्थेनं ठेवीदारांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तब्बल 31 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी देवाई महिला नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर शहरातील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संचालकांनी स्वतःच्या संस्थांना बेकायदा 13 कोटी 83 लाख 79 हजार 101 रुपयांचे कर्ज देऊन आयसीआयसीआय बँकेत 8 कोटींची एफडी केल्याचं ताळेबंदात दाखवून तब्बल 31 कोटी 91 लाख 14 हजार 752 रुपये परस्पर हडप केल्याचं समोर आलंय.

महिना भरापासून मुख्य कार्यालयास टाळे : आदर्श नागरी पतसंस्थेचा घोटाळा नुकताच उघड झाला असताना, पुन्हा एकदा एका पतसंस्थेनं ठेवीदारांचे पैसे बुडवण्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आलाय. सातारा देवळाई परिसरातील "देवाई" महिला नागरी पतसंस्थेनं जवळपास दोन हजारांहून अधिक खातेदारांच्या ठेवी बुडवल्याचं समोरआलंय. गेल्या महिन्याभरापासून पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला टाळे लागले असून ठेवीदार पैशांसाठी चपला झिजवत आहेत. पतसंस्थेचे संचालक महादेव काकडे फरार झाले आहेत. तर काही महिन्यांपासून पगार थकल्यानं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीदेखील पोलीसात धाव घेतलीय.

देवाई संस्थेने सर्वसामान्यांना फसवले : सातारा परिसरातील देवाई महिला नागरी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर गेल्या महिनाभरापासून ठेवीदार पैसे मिळतील, या आशेनं बँकसमोर येऊन जात होते. मात्र, काही दिवसांपासून पतसंस्थेचं कार्यालय उघडलंच नाही. बँकेत आपल्या कष्टाची जमापुंजी ठेवणाऱ्या ठेवीदारांनी याबाबत विचारणा केली असता, संस्थेनं गेल्या काही महिन्यात जागेचं भाडं थकवल्यानं मालकानं कुलूप लावल्याचं समोर आलंय. तसंच तिथं काम करत असलेले कर्मचारीही रोज लावलेलं कुलूप पाहून परत जात आहेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून बँकेतील रोख पूर्णतः संपलेली आहे. त्यामुळं सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारदेखील देण्यात आलेला नाही. याबाबत अनेक वेळा विचारणा केली असता लवकरच पैसे मिळतील, असं आश्वासन संस्थेचे अध्यक्ष महादेव काकडे यांनी दिलं होतं. मात्र, कुठलाही प्रकारचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनीच सातारा पोलीसांत संस्थेच्या अध्यक्षांविरोधात तक्रार नोंदवली आहे.

ठेवीदार झाले त्रस्त : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देवाई महिला नागरी पतसंस्थेच्या चार शाखा आहेत. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक ग्राहकांनी पैसे गुंतवले असून यात, माजी सैनिकांनी देखील पेन्शनचे मिळालेले पैसे ठेव स्वरूपात दिले होते. वर्षाला 15 टक्के व्याज देणार असं आमिष संस्थेचे संचालक महादेव काकडे यांनी सर्वांना दाखवले होते. इतकच नाही तर सातारा, बारामती या परिसरात एजंट नेमून ठेवीदार आणण्यात आले होते. चांगला परतावा मिळेल म्हणून अंदाजे 50 कोटींच्या जवळपास रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोणालाही पैसे परत मिळाले नाही. काहींची ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. तर, काहींना आपल्या अडीअडचणीच्या काळात ठेवलेली रक्कम परत हवी होती. मात्र संचालक फरार झाल्यानं बँकेच्या कर्मचाऱ्यांचीदेखील मोठी कोंडी झालीय. आता पैसे परत कसे द्यायचे असा प्रश्न काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना पडलाय. कारण पतसंस्था सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना चांगला परतावा मिळेल म्हणून आपले पैसे ठेव स्वरूपात ठेवण्यास सांगितलं होतं. आता ठेवीदार रोज कर्मचाऱ्यांच्या घरी चकरा मारत असल्यानं काय करावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय. मात्र, दुसरीकडे संचालक महादेव काकडे यांनी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर सर्वांचे पैसे बुडाले समजा अशी धमकी दिली असल्याचंही खातेदारांनी सांगितलं.

ठेवीदारांनी दिली तक्रार : शहरात आदर्श नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून चारशे कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सर्वसामान्य लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे ठेव स्वरूपात बँकेत दिले होते. मात्र संचालक मंडळांचा अनागोंदी कारभारामुळे बँक अडचणीत सापडली आणि सर्वसामान्यांचे पैसे यात अडकले. हे प्रकरण ताज असतानाच देवाई महिला नागरी पतसंस्थेनंंही अशाच पद्धतीनं ग्राहकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. त्यामुळं सर्व ग्राहकांनी एकत्र येत पोलीस आयुक्तालयात आपली तक्रार दिली होती. त्यानंतर सातारा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र पुढे काय? हा प्रश्न निर्माण झालाय. गेल्या तीन महिन्यांत दोन पतसंस्थांकडून ग्राहकांची झालेली फसवणूक यामुळे, पतसंस्था किती सुरक्षित आहेत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.

हेही वाचा :

  1. Adarsh Bank 200 Crore Scam: आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा; खासदार इम्तियाज जलील काढणार ग्राहकांसाठी काढणार निषेध मोर्चा
  2. Mahadev App scam : ईडीची मोठी कारवाई, सनी लियॉनसह टायगर ईडीच्या पिंजऱ्यात? मुंबईबरोबर अनेक ठिकाणी छापे
  3. Adarsh Bank Scam : आदर्श संस्थेत ठेवीदार त्रस्त, पैसे कधी मिळणार काही कळेना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.