औरंगाबाद - जिल्ह्यातील खुलताबाद दर्गा हजरत जरजरी बक्ष उरुसानिमित्त होणारी यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांना दर्गामध्ये केवळ दर्शन घेता येणार असून सर्व धार्मिक विधी पार पडणार आहे. याबाबत अधिकृत नियमावली जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे, अशी माहिती र्गा समितीचे उपाध्यक्ष मोहम्मद नईम यांनी दिली.
भाविकांनी केवळ दर्शनासाठीच यावे
दरवर्षी मोठ्या उत्साहात खुलताबाद उरूस पार पाडतो. मात्र, कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे धार्मिक स्थळ बंद असल्याने उरूस व जत्रा भरवण्यात आल्या नाहीत. मात्र, धार्मिक स्थळ दर्शनांसाठी खुली करण्यात आली असल्याने आता 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान उरूसानिमित्त सर्व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे जत्रा म्हणजे पाळणे, विविध दुकाने लागणार नाही. त्यामुळे भाविकांनी केवळ दर्शनासाठईच यावे, असे आवाहन दर्गा समितीचे उपाध्यक्ष मोहम्मद नईम यांनी दिली.
कोरोना नियमांचे पालन करून मिळेल भक्तांना प्रवेश
उरूस होणार असला तरी फक्त धार्मिक विधी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उरूस होणार नसून केवळ भाविकांना केवळ दर्शन घेता येणार आहे. दर्शनासाठी विनामास्क येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. दर्गा परिसराचे सतत निर्जंतुकीकरण केले जाईल. लहान मुलांना व 60 वर्षांवरील भाविकानी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन मोहम्मद नईम यांनी केले आहे.
हेही वाचा - सायकलपटू सोनम शर्माचा विक्रम, एकाच वर्षात दोनदा पूर्ण केली 'सुपर रँडोनियर्स' स्पर्धा