ETV Bharat / state

सिल्लोडच्या मका उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

खते आणि बियाणांच्या किंमती दरवर्षी वाढत आहेत. मका पिकासाठी एकरी जवळपास २० हजार रुपये खर्च येतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. एखाद्या वेळेस पिकांचे चांगले उत्पादन झालेच तर त्याला भाव मिळत नसल्याने मका उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

सिल्लोडच्या मका उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका
author img

By

Published : Nov 16, 2019, 5:12 PM IST

औरंगाबाद - गेल्या दोन तीन वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. काही प्रमाणात हाती आलेल्या मका पिकाला मातीमोल भाव मिळत नसल्याने औरंगाबादच्या सिल्लोडमधील मका उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे. खते आणि बियाणांच्या किंमती दरवर्षी वाढत आहेत. मका पिकासाठी एकरी जवळपास २० हजार रुपये खर्च येतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. एखाद्या वेळेस पिकांचे चांगले उत्पादन झालेच तर त्याला भाव मिळत नसल्याने मका उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

सिल्लोडच्या मका उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका

यावर्षी सुरुवातीला मक्यावर लष्कर आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी महागड्या किटक नाशकांची फवारणी केली. यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने कापणीला आलेले पीक भिजून सडले. त्यामुळे मक्याच्या कणसाला कोंब फुटली. असे एकावर एक संकट शेतकऱ्यावर येत असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावत काही प्रमाणत पीक मिळविले. यातून महत्त्वाच्या आर्थिक गरजा भागविण्याच्या आशेने मका बाजारात घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा भाव मिळत आहे. यावर्षी मका कमी प्रमाणात असल्याने जास्त भाव मिळणे अपेक्षित होते. यंदा २ हजार रुपये प्रति क्विंटल भाव अपेक्षित असताना १ हजार ते ११०० रुपये भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी मका ओला आणि डागाळलेला असल्यामुळे मक्यापासून स्टार्च निर्माण करणाऱ्या कंपन्याही मका घेत नाहीत. विविध प्रकारच्या मका उद्योग प्रक्रियांमध्ये मक्याला उठाव नसल्याने भाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये शॉर्ट सर्किटमुळे हायवा ट्रक पेटला

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात जवळपास ५० हजार हेक्‍टरवर मका पिकाची लागवड होते. मका उत्पादनात हा तालुका राज्यात अग्रेसर आहे. लाखो टन मका या भागात उत्पादित होतो. मात्र, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतेच साधन नसल्याने पाहिजे तसा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये फरक पडत नाही. मका प्रक्रिया करणारे दोन तीन मोठे कारखाने या भागात वर्षभर चालतील इतका मका फक्त सिल्लोड तालुक्यात पिकतो. या व्यतिरिक्त इतर जवळील तालुक्यातही मका पिकविला जातो. ज्यावेळी मक्याची मळणी केली जाते, नेमकी त्याच वेळी मक्याचे भाव कोसळतात. वर्षभर या पिकाच्या भरोशावर असणारा शेतकरी नाईलाजाने त्याची पैशाची अडचण भागवण्यासाठी मिळेल त्या भावात मका विक्री करतो. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्यासाठी जागा आहे, ते चार पाच महिने साठवण करून बऱ्यापैकी भाव मिळवतात. पण अशा शेतकऱ्यांची संख्या खूप थोडी आहे. खासगी व्यवस्थापकांनी या ठिकाणी गोदामे बांधली आहेत. मात्र, त्याचे भाडे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

हेही वाचा - गंगापूरमधील नुकसानग्रस्त पिकांची खासदार जलील यांच्याकडून पाहणी, सरसकट पंचनाम्याचे दिले आदेश

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने सिल्लोड येथे शासकीय मका प्रकल्पाचे उद्घाटन केले. मात्र, सत्तांतरानंतर हा प्रकल्प अद्याप उभा राहू शकला नाही. सिल्लोडमध्ये शेकऱ्यांसाठी मका प्रकल्प उभारणे गरजेचे असताना या विषयी फक्त राजकारण होत आहे. सिल्लोडमध्ये मका प्रक्रिया उद्योग केंद्र नाही आणि साठवण व्यवस्था ही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या भागामध्ये दलाल मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दलाल व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी ग्रामीण भागात मका खरेदी विक्रीचे मोठे बस्तान मांडले आहे. प्रत्येक गावात मका व्यापारी आढळतो. सिल्लोडमधून मका कमी भावात खरेदी करायची आणि परराज्यात त्याची जास्त भावाने विक्री करायची हा व्यवसाय मोठा आहे. यात गुजरात राज्यामध्ये उभे असलेल्या कंपन्यांमध्ये सिल्लोडच्या मक्‍याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्या भागात मका नाहीत, अशा राज्यांमध्ये मका प्रकल्प मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, या भागात मका मोठ्या प्रमाणात पिकतो, त्या भागांमध्ये एकही प्रकल्प अस्तित्वात नाही. यात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

Intro:सिल्लोड च्या शेतकऱ्यांना दुहेरी फटका
मका पिकाला मातीमोल भाव
प्रक्रिया उधोग नसल्याचा परिणाम

गेल्या दोन - तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मका उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी ओला दुष्काळ व त्यांनतर काही प्रमाणात हाती आलेले मका पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने औरंगाबादच्या सिल्लोड मधील मका उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसत आहे.

खत - बियाणांची भाव दरवर्षी वाढत आहेत. मका पिकासाठी एकरी जवळपास 20 हजार रुपये खर्च येतो. सततच्या असमतोल पर्जन्यमानामुळे उत्पादन त्या प्रमाणात होत नाही.आणि उत्पादन झालेस तर भाव मिळत नसल्याने हा प्रश्न सुटायला तयार नाही.Body:यावर्षी सुरुवातीला मका पिकावर लष्कर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांनी महागडे किटक नाशकांची फवारणी केली.नंतर परतीच्या पावसाने कापणीत आलेले पीक पाण्यात भिजले. यामुळे मकाच्या कंसाला कोमे फुटली. असे एकावर एक संकट शेतकऱ्यावर येत असताना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जीवाचीबाजी लावत काही प्रमाणत पीक मिळविले. यातून महत्वाच्या आर्थिक गरजा भागविण्याच्या आशेने मका बाजारात घेवून गेलेल्या शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या तुलनेत निम्मा भाव मिळत असल्याचे लक्षात आल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले . यावर्षी मका कमी प्रमाणात असल्याने जास्त भाव मिळणे अपेक्षित होते . यंदा 2 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव अपेक्षित असतांना 1 हजार ते 1100 रुपये भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावर्षी मका ही ओली व डागी असल्यामुळे मक्यापासून स्टार्च निर्माण करणाऱ्या कंपन्या ही मका घेत नाही. विविध प्रकारच्या मका उधोग प्रक्रियांमध्ये मका ला उठाव नसल्याने मकाला भाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात जवळपास 50 हजार हेक्‍टरवर मका पिकाची लागवड होते. मका उत्पादनात हा तालुका राज्यात अग्रेसर आहे .लाखो टन मका या भागात उत्पादित होते. मात्र त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतेच साधन नसल्याने त्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये फरक पडत नाही. मकाप्रक्रिया करणारे दोन तीन मोठे कारखाने या भागात वर्षभर चालतील इतका मक्का फक्त सिल्लोड तालुक्यात पिकतो। या व्यतिरिक्त इतर जवळील तालुक्यातही मका पिकविला जातो. ज्यावेळी मक्याची मळणी केली जाते नेमकी त्याच वेळी मक्याचे भाव कोसळतात. वर्षभर या पिकाच्या भरोशावर असणारा शेतकरी नाईलाजाने त्याची पैशाची अडचन भागवण्यासाठी मिळेल त्या भावात मका विक्री करतो. ज्या शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्यासाठी जागा आहे ते चार पाच महिने साठवण करून बऱ्यापैकी भाव मिळवतात . पण अशा शेतकऱ्यांची संख्या खूप थोडी आहे. खासगी व्यवस्थापकांनी या ठिकाणी गोदामे बांधले आहेत. मात्र त्याचे भाडे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारे सारखे नाही.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने सिल्लोड येथे शासकीय मका प्रकल्पाचे उदघाटन केले. मात्र सत्तांतरानंतर हा प्रकल्प अध्याप उभा राहू शकला नाही. सिल्लोड मध्ये शेकऱ्यांसाठी मका प्रकल्प उभारणे गरजेचे असतांना या विषयी फक्त राजकारण झाले.Conclusion:सिल्लोड मध्ये मका प्रक्रिया उद्योग केंद्र नाही ,आणि साठवण व्यवस्था ही कमी प्रमाणात आहे, यामुळे या भागामध्ये दलाल मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दलाल व्यतिरिक्त बऱ्याच जणांनी ग्रामीण भागात मका खरेदी विक्रीचे मोठे बस्तान मांडले आहे. प्रत्येक गावात मका व्यापारी आढळतो. सिल्लोड मधून मका कमी भावात खरेदी करायची आणि परराज्यात त्याची जास्त भावाने विक्री करायची हा व्यवसाय मोठा आहे .यात गुजरात राज्यामध्ये उभे असलेल्या कंपन्यांमध्ये सिल्लोडच्या मक्‍याला मोठ्याप्रमाणात मागणी आहे . ज्या भागात मका नाहीत अशा राज्यांमध्ये मका प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभी आहेत . मात्र या भागात मका मोठ्या प्रमाणात पिकते त्या भागांमध्ये एकही प्रकल्प अस्तित्वात नाही हे विशेष यात नुकसान सहन करावे लागते ते फक्त शेतकऱ्यांना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.