ETV Bharat / state

कन्नड़ येथे आजारांची लाट, मात्र रुग्णालयंच पाहतंय औषधांची वाट

कन्नड तालुक्यात वातावरणात दररोज होणाऱ्या बदलांमुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. कन्नड शहरामध्ये सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत.

dengue
डेंग्यू
author img

By

Published : Dec 17, 2019, 1:02 PM IST

Updated : Dec 17, 2019, 1:18 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यात वातावरणात दररोज होणाऱ्या बदलांमुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. कन्नड शहरामध्ये सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. प्रत्येक घरामध्ये दोन किंवा तीन रुग्ण आहेतच. त्याचबरोबर ग्रामीण भागात हे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहेत. यावर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये मात्र औषधांची कमतरता आहे.

कन्नड तालुक्यात साथीच्या आजारांची लाट

हेही वाचा - देशात प्रथमच येणार कलाकार रोबो, मुंबई आयआयटीमध्ये सादर करणार कला

डॉ. रुचुता रणवीर थोरात यांनी सांगितले की, सांडपाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात याचे जास्त प्रमाण आहे. त्यासाठी सांडपाण्याचा उपयोग कमी करणे, ताप आला की लगेच रक्त तपासणी करून त्यावर उपचार करणे, स्वछता ठेवणे, त्यामुळे या आजारांना आळा बसेल. जर ताप येऊन तो लगेच कमी होत नसल्यास लगेच रक्त तपासनी करून घेण्याचे आवाहन डॉ. रुचुता रणवीर थोरात यांनी केले आहे.

शहरातील वातावरणाच्या बदलामुळे सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज ग्रामीण रुग्णालयात 300 ते 400 रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे.

औषधासंदर्भात रुग्णालयातून माहिती घेतली असता, रुग्णालयात टॅबलेट असून खोकल्यासाठीचे औषधं मागली 20 दिवसांपासून उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सध्या साथीच्या रोगांचे प्रमाण जास्त असल्यामुळे जिल्हा चिकित्सलयातूनही औषधं उपलब्ध होत नसल्याचे समजले. या सर्व परिस्थितीमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तपासणीसाठी येताना रुग्णांना औषधं बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.

Intro:
कन्नड़ तालुक्यात वातावरणात दररोज होणाऱ्या बदला मुळे साथीचा रोगाचा जास्त प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कन्नड़ शहरामधे सर्दी, खोकला, व तापाचे जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहे. प्रत्येक घरामधे 2 किंवा 3 रुग्ण है आहेच. त्याचबरोबर ग्रामीण भागात है रुग्ण जास्त प्रमाणात आढळत आहे.
डॉ. रुचुता रणवीर थोरात यांनी सांगितले की, आपल्या घरात होत असलेल्या सांड पाण्यामुळे डेंगू चे प्रमाण वाढत आहे. जास्त प्रमाणात ग्रामीण भागात यांचे जास्त प्रमाण आहे. त्या साठी सांड पाण्याचा उपयोग कमी करणे, ताप आला की लगेच रक्त तपासणी करुण त्यावर उपचार करणे, जेवढी स्वछता आपन ठेवाल तेवढ़ चांगल राहील, जे ने करुण ह्या आजाराला आळा बसेल. जर ताप येणे, आणि तो ताप उतरत नसेल तर लगेच रक्त तपासनी करुण घेणे गरजेचे आहे त्या मुळे डेंगू आहे की नाही है कळेल .
Body:त्याच बरोबर शहरात वातावरणाचा बदला मुळे सर्दी, खोकला, ताप यात खुप प्रमाणात वाढ झालेली आहे. दरोज ग्रामीण रुग्णालयात 300 ते 400 रुग्णाची तपासनी केली जात आहे. है (viral infaction) साथ असल्याचे डॉ. रुचिता यांनी सांगितले यासाठी जर खोकला, सर्दी, शिख येत असेल तर तोंडाला रुमाल ठेवणे गरजेचे आहे. जे ने करुण दुसऱ्याला यांचा त्रास होणार नाही . जास्त प्रमाणात लहान मुलांना यांची साथ दिसत आहे.Conclusion:रुग्णालयात जेव्हा माहिती घेतली की, यावर कोणकोणती औषधी उपलब्ध आहे तर यावर त्यांनी टैबलेट आहे परंतु खोकल्या साठी लागणारी ( लिक्विड ) 20 दिवसापासून उपलब्ध नाही. त्यांना विचारले असता जिल्हा चिकित्सलयातून उपलब्ध नाही, जास्त प्रमाणात ही साथ चालु असल्यामुळे औषधा ची कमतरता भासत आहे, त्यामुळे रुग्णाचे हाल होत आहे त्यांना है औषध बाजारातून विकत घेण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना खिशाला झळ बसत आहे. नागरिकांनी मागणी केली की है खोकल्या साठी लागणार Liquid है रुग्णालयात भेटायला पाहिजे जे ने करुण रुग्णाचे हाल होणार नाही.
Last Updated : Dec 17, 2019, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.