औरंगाबाद - येथून बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास अक्कलकुवाला जाणाऱ्या बसने दौलताबाद घाटातील ऐतिहासिक दिल्ली गेटला धडक दिली. चालकाचा गेटमधून बस काढण्याचा अंदाज चुकल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील प्रवाशांपैकी तीन मुले, एक महिला व एक पुरूष किरकोळ जखमी झाले आहेत.
औरंगाबाद येथील मध्यवर्ती बसस्थानकवर सकाळी औरंगाबाद ते अक्कलकुवा जाणारी धुळे आगारातील बस (एमएच २०, बीएल ३०२४) निघाली. दरम्यान येथील ऐतिहासिक दिल्ली गेटमधून बस काढताना चालकाचा अंदाज चुकल्याने बस गेटला धडकली. अचानक बसलेल्या या धडकेत बसमधील १० ते १५ वर्षाखालील तीन मुले, एक पुरूष व महिला किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती आहे. सदर जखमींना स्थानिकांच्या मदतीने औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये गुटखा थुंकणाऱ्या कारचालकामुळे अपघात; तरुणाचा मृत्यू
दरम्यान औरंगाबाद सोलापूर महामार्ग काही काळ बंद झाला होता. यावेळी दौलताबाद पोलीस ठाण्याचे स्थानिक पोलीस कर्मचारी एसएम खाजेकर, सचिन त्रिभुवन व छावणी वाहतूक शाखेचे पिके टकसाळे व शिवराज ठाकरे यांनी तातडीने अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा - वंचितसोबत जाण्यासाठी आमची पण तयारी - खासदार इम्तियाज जलील