औरंगाबाद - पोलिसांना टीप दिली म्हणून अट्टल गुन्हेगाराने अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ शनिवारी 31 जुलैला समोर आला. याप्रकरणी 24 जुलैला पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
22 जुलै रोजी घडली घटना -
शोएब ऊर्फ सलमान खान जफर खान या गुन्हेगाराबाबत एक अल्पवयीन मुलाकडे असलेली माहिती त्याने पुंडलिक नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली. या कारणावरून शोएब उर्फ सलमान या आरोपीने अल्पवयीन मुलाचे 22 जुलैला अपहरण करून जबर मारहाण केली. याबाबत 24 जुलैला पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे सुमारे १७ हजार कुटुंब बेघर; नुकसानभरपाईचा आकडा वाढण्याची शक्यता
व्हिडिओ व्हायरल -
पुंडलिक नगर पोलिसांना टीप दिली म्हणून अल्पवयीन मुलाचे अपहरण करून बंद खोलीत नेऊन त्याला दांड्याने मारहाण करत असताना सोईबच्या साथीदाराने एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ शनिवारी 31 जुलैला चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी आरोपी शोएब ऊर्फ सलमान खान जफर खान याच्याविरोधात पुंडलिक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शोएबला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - लैंगिक अत्याचार प्रकरण : 'गोव्याच्या मुख्यंत्र्यांचं वक्तव्य महिलांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करणारं'