ETV Bharat / state

मोकाट कुत्र्यांचा कन्नडमध्ये सुळसुळाट; आरोग्य सभापतींनाच कुत्र्याने केले जखमी - मोकाट कुत्रे कन्नड

कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून गुरुवारी नगरसेविका आणि आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांनाच कुत्र्याने चावा घेतला आहे.  गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नगरसेविका आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना लक्ष केले. यात त्यांच्या पायाला इजा झाली आहे.

corporator vidya kashinand injured by dog
मोकाट कुत्र्यांचा कन्नडमध्ये सुळसुळाट; आरोग्य सभापतींनाच कुत्र्याने केले जखमी
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:00 PM IST

औरंगाबाद - कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून गुरुवारी नगरसेविका आणि आरोग्य सभापती विद्या काशीनंद यांनाच कुत्र्याने चावा घेतला आहे. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नगरसेविका आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना लक्ष्य केले. यात त्यांच्या पायाला इजा झाली आहे.

मोकाट कुत्र्यांचा कन्नडमध्ये सूळसुळाट; आरोग्य सभापतींनाच कुत्र्याने केले जखमी

हेही वाचा - भारत आणि 'उगवत्या सूर्याचा देश'...

विशेष म्हणजे विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच नगरपरिषदेच्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, असे आदेश दिले होते. कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली असून यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावा घेतला आहे. यामुळे नगरसेविका यांनी तत्काळ कुत्र्यांवर आवर घालावा यासंबंधीचे निवेदन मुख्याधिकरी यांना दिलेले होते. विद्या काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. कन्नड येथे औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जात असल्याचा नागरिकांनी केला आहे.

भीक नको पण कुत्रा आवर म्हणीचा प्रत्यय -

कन्नड शहरातील नागरिकांना भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा प्रत्यय या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येत आहे. लोकांना कामानिमित्त बाहेर पडायची भीती आहे. जर बाहेर पडले आणि कुत्रा चावला तर लस उपलब्ध असेलच याची शाश्वती नसते. जर लस उपलब्ध नसेल तर औरंगाबादला जाऊन उपचार घ्यावे लागतात. वेळ, पैसा, नाहक त्रास, दगदग, मनस्ताप आणि कुटुंबीयांना पण काम धंदा सोडून घरातील त्या व्यक्तीच्या काळजीसाठी औषधोपचारासाठी थांबावे लागते.

हेही वाचा - किरकोळ बाजारपेठेत महागाईचा ३ वर्षातील उच्चांक; नोव्हेंबरमध्ये ५.५४ टक्के नोंद

Intro:

कन्नड शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून शालेय विद्यार्थी,नागरिक, महिला, पुरुष दहशतीखाली वावरताना दिसत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवार दि.12 रोजी नगरसेविका विद्या काशीनंद यांनाच चावा घेऊन जखमी केले आहे.गुरुवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घरासमोरच पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना लक्ष केले.त्यांच्या पायास कडाडून चावा घेऊन जखमी केले.
विशेष म्हणजे विद्या काशीनंद यांनी यापूर्वीच नप च्या सभेमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा .शालेय विद्यार्थी आणि नागरिकांत जबरदस्त धास्ती असून यापूर्वी काही शाळकरी मुलांना कुत्र्याने चावून जखमी केले असल्यासाने तात्काळ या कुत्र्यांवर आवर घालावा या बाबतचे निवेदन मुख्याधिकरी यांना दिलेले होते.विद्या काशीनंद या स्वतः शिक्षण व आरोग्य सभापती असल्याने त्यांनी याबाबत वेळोवेळी मुख्याधिकाऱ्यांना लेखी व तोंडी सूचना दिल्या मात्र त्याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले .

Body:औरंगाबादेतील कुत्री कन्नड शहरात
शहर व परिसरात औरंगाबाद येथील पकडलेली कुत्री रात्री बेरात्री आणून सोडली जातात.अचानक कुत्री कशी वाढली असा प्रश्न नागरिकांना पडतो.

पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे विद्यार्थी धास्तावले
पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे शालेय विद्यार्थी धास्तावलेले असून शाळेत जाण्यास धजावत नाही.कुत्र्यांच्या दहशतीखाली विद्यार्थी आहेत.वृद्ध नागरिक महिला पुरुष देखील कामानिमित्त घराबाहेर पडताना दहशतीखाली जात आहेत.कुत्रा चावल्यास शहरात लस उपलब्ध नसल्यास औरंगाबाद येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.

भीक नको पण कुत्रा आवर म्हणीचा प्रत्यय
कन्नड शहरातील नागरिकांना भीक नको पण कुत्रा आवर या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे येत आहे.कारण कामानिमित्त बाहेर पडायची भीती आहे.जर बाहेर पडले आणि कुत्रा चावला तर लस उपलब्ध असेलच याची शाश्वती नसते.जर लस उपलब्ध नसेल तर औरंगाबाद ला जाऊन उपचार घ्यावे लागतात.वेळ ,पैसा,नाहक त्रास दगदग, मनस्ताप आणि कुटूंबियांना पण काम धंदा सोडून घरातील त्या व्यक्तीच्या काळजीसाठी औषधोपचारासाठी थांबावे लागते.Conclusion:विद्या काशीनंद यांनी ज्यावेळी नप मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते त्याच वेळी कारवाई केली असती तर आता अर्यंत या कुत्र्यांचा बंदोबस्त केला गेला असता. आता तरी नप अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करतील की अधिकाऱ्यांनाच कुत्रा चावल्यास त्यांचे डोळे उघडतील असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.