ETV Bharat / state

Nana Patole News : कुठला आमदार कुठल्या गटात हे विधानसभा अध्यक्षही छातीठोकपणे सांगू शकणार नाहीत, राष्ट्रवादीवरुन नाना पटोलेंचा टोला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वेरुळ येथील घृष्णेश्वर आणि खुलताबाद येथील भद्रा मारुती देवस्थानचे दर्शन घेतले. खुलताबाद शहरातील 'जर जरी बक्ष' या दर्ग्यावर देखील त्यांनी चादर चढवली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री होण्याबाबत नाना पटोलेंनी जर ती कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया दिली.

Nana Patole News
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Aug 7, 2023, 1:28 PM IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना भेट दिली. सध्या श्रावण महिना सुरू आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा धार्मिक महिना समजला जातो. आम्ही कोणासारखा दिखावा करत फिरत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. यावेळी त्यांनी औरंगजेब कबर स्थळी भेट देणे टाळले. मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात धार्मिक भावना दुखावण्याचे कोणतेही काम करत नाही. त्यामुळे जे सर्व धर्माचे प्रतीक आहे, त्या ठिकाणी मी दर्शनासाठी जातो अशी प्रतिक्रिया नाना पटोले त्यांनी माध्यमांना दिली.

'मीच' प्रदेशाध्यक्ष राहणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, आगामी सर्व निवडणुका माझ्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे उत्तर त्यांनी दिले आहे. नाना पटोले सध्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शहरात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेत चर्मकार समाजाचा बांधवांशी वार्तालाप केला. नुकतेच पावसाळी अधिवेशनात डबल इंजिन सरकार असूनही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करू शकले नाहीत. नोकर भरती सुरू असताना त्यातून पैसे उकळण्याचे धंदे सुरू करण्यात आले आहेत. या सरकारला आता सत्तेतून मुक्त होण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादीबाबत बोलणे टाळले : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट सध्या सत्तेत सामील झाला आहे. मात्र त्यांचे काय चालू आहे, हे बघण्याचे आमचे काम नाही असे उत्तर नाना पटोले यांनी माध्यमांना दिले. सरकारने अद्यापही अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत दिली नाही. भाजपा-शिंदे सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यामुळे आता ई.डी.ए. म्हणजेच एकनाथ, देवेंद्र आणि अजित असे सरकार झाले आहे. कोणता आमदार नेमका कोणाच्या बाजूला आहे, हे विधानसभा अध्यक्ष देखील सांगू शकणार नाहीत. या सरकारचे अपयश दिवसेंदिवस वाढत आहे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, ते न करण्याचे पाप भाजपा करत आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

हेही वाचा :

Nana Patole on Ajit Pawar : मुख्यमंत्र्यांच्या राखीव खुर्चीवर अजित पवार बसले, नाना पटोले म्हणाले...

  1. Nana Patole On MLA Fund : दोन दिवसांत काँग्रेस आमदारांना विकासनिधी द्या, अन्यथा कोर्टात जाणार - नाना पटोले
  2. Nana Patole on Opposition Leader : पुढच्या आठवड्यात ठरणार काँग्रेसचा विरोधी पक्षनेता - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.