ETV Bharat / state

Sandipan Bhumre :  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकी, सत्तारांनंतर शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे अडचणीत - Complaint of intimidation against Sandipan Bhumre

कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर टीका होत आहे. भुमरे यांनी व्हाट्सअपवर फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप पैठण येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्याने केला आहे.

Sandipan Bhumre
संदीपान भुमरे
author img

By

Published : Nov 11, 2022, 10:34 AM IST

Updated : Nov 11, 2022, 12:29 PM IST

औरंगाबाद : कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर टीका होत आहे. आता शिंदे गटाचे आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजना मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे ( Guardian Minister of Aurangabad Sandipan Bhumre ) यांनी व्हाट्सअप कॉल करून धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने केली आहे. औरंगाबाद पोलिस अधीक्षक कार्यालयात ( Aurangabad Superintendent of Police Office ) ही तक्रार देण्यात आली असून, युवराज चावरे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी युवराजने केली आहे.

संदीपान भुमरे यांनी दिली धमकी : भुमरे यांनी १० नोव्हेंबर २०२२ रोजी वाजता माझ्या व्हाट्सअपवर फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. असा आरोप पैठण येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्याने केला आहे. माझ्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट का केली, असे भुमरे यांचे म्हणणे होते. तुला जास्त झाले का, पाचोड गावात आल्यावर तुला दाखवतो, नाहीतर तुझ्या घरी पोर पाठवून मारायला लावतो अशी धमकी दिल्याचे युवराज शिवाजीराव चावरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच तुझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करेल, तुला जेलमध्ये टाकेल, मी पालकमंत्री असून माझे काहीही होऊ शकत नाही. पण तुला कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही, अशी धमकी भुमरे यांनी दिल्याचा आरोप तक्रारदार तरुणाने केला आहे.

पोलिसांनी तक्रार घेतली नाही : संदीपान भुमरे यांनी फोनवरून धमकी दिल्यानंतर आपण सुरुवातीला पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, तेथे तक्रार घेतली नाही. पाचोड पोलीस ठाण्यात आपण तीन वेळा तक्रार देण्यासाठी गेलो होतो, पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयात याबाबत तक्रार दिली असे युवराजने सांगितले आहे.

Last Updated : Nov 11, 2022, 12:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.