औरंगाबाद - शहरात लॉकडाऊनच्या चर्चेंना उधाण आले आहे. यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. पूर्वीच्या लॉकडाऊन दरम्यान आलेल्या अडचणी लक्षात घेता किराणा ते दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यास लोकांनी प्राधान्य दिले. मात्र या खरेदी दरम्यान सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. आज सकाळी जाधववाडी येथे भाजीपाला खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी जमली होती.
दारू दुकानांसमोरही गर्दी -
लॉकडाऊन लागणार यामुळे अनेकांची भाजीपाला खरेदीसाठी धडपड सुरू होती. तर दुसरीकडे मद्यपींना दारूची चिंता होती. मागच्या लॉकडाऊन दरम्यान महाग मद्य विकत घ्यावं लागल्याने अनेकांच्या खिशाला कात्री लावली होती. यामुळे अनेक मद्यप्रेमींनी मद्याच्या दुकानावर गर्दी केली होती. यातील अनेकांनी तर आठवडाभर पुरेल एवढा मद्यसाठा करून ठेवला आहे.
हे ही वाचा - इसिसमध्ये दाखल झालेला 'तो' तरुण कल्याणला परतला