ETV Bharat / state

सेल्फी बेतला जीवावर.. पैठणच्या १५ वर्षीय मुलाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू

पैठण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाचारण करून शोध मोहीम सुरू केली. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर विनायकचा मृतदेह शोधून काढण्यास पथकाला यश आले. विनायकचे वडील सुरेश बाबर हे पैठण नगर परिषदेचे कर्मचारी आहेत

विनायक सुरेश बाबर
विनायक सुरेश बाबर
author img

By

Published : Jan 11, 2020, 7:17 PM IST

औरंगाबाद - सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून पैठण येथील युवकाचा मुत्यू झाला आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जलविद्युत केंद्राजवळ शनिवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे पैठण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक सुरेश बाबर (वय १५ रा. जैनपुरा पैठण) असे मृत मुलाचे नाव आहे.

शोध मोहीम राबवताना
शोध मोहीम राबवताना

विनायक हा आपल्या दोन मित्रांसह जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जल विद्युत केंद्राजवळ सेल्फी काढत होता. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तत्काळ या घटनेची माहिती स्थानिकांना दिली. तसेच स्थानिकांनी पैठण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाचारण करून शोध मोहीम सुरू केली. एक तासाच्या शोध मोहिमेनंतर विनायकचा मृतदेह शोधून काढण्यास पथकाला यश आले. विनायकचे वडील सुरेश बाबर हे पैठण नगर परिषदेचे कर्मचारी आहेत. विनायक हा सुरेश बाबर यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने संपूर्ण पैठणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:पैठण येथे सेल्फीच्या नादात पाण्यात बुडून युवकाचा मुत्यू.....
Body:सेल्फी फोटोच्या नादात गोदावरी नदीपात्रात बुडुन पैठण येथील युवकाचा मुत्यू झाला आहे. ही शनिवारी दुपारी दोन वाजता पैठण जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जलविद्युत केद्राजवळ घडली. याघटनेमुळे पैठण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.Conclusion:विनायक सुरेश बाबर वय वर्ष १५ रा. जैनपुरा पैठण शहर असे मयत मुलाचे नाव आहे. मयत विनायक हा आपल्या दोन मित्रासह जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी जल विधुत केंद्राजवळ सेल्फी फोटो काढत असतांना त्याचा तोल गेला आणि पाण्यात बुडाला. पैठण नगर परीषद अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिक युवकानी एक तासात मृतदेह शोधुन काढला. पैठण नगर परिषद कर्मचारी सुरेश बाबर यांचा एकुलता एक मुलगा होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.