छत्रपती संभाजीनगर Chhatrapati Sambhajinagar Fire : छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला मध्यरात्री आग लागून 6 कामगारांचा मृत्यू झालाय. तर 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवलाय. ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली असून आग विझवण्यात तब्बल चार तासांचा कालावधी लागला. नेमकी आग कशामुळं लागली, याची अद्याप खात्रीशीर माहिती समोर आली नाही. सर्व मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आले असून, पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरु केलाय.
हँडग्लोज तयार करणाऱ्या कंपनीत अचानक आग : वाळूज औद्योगिक परिसरातील सी 216 येथील सनशाईन एंटरप्राईज या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये एकूण 20 ते 25 कामगार काम करतात. एकावेळी 10 कामगार कंपनीत काम करतात. रात्रीपाळी असताना सगळे कर्मचारी झोपेत असताना अचानक कंपनीला आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाटू लागल्यानं जाग आली. त्यावेळी त्यांनी पाहिले असता, आग लागल्याचं निदर्शनास आलं. बाहेर पडण्याच्या जागेवरच आग लागल्यानं कामगारांना बाहेर येणं शक्य नव्हतं. परंतु, काही कामगार पत्रे उचकटून एका झाडाच्या मदतीनं बाहेर पडले. मात्र सहा जणांना बाहेर पडणं शक्य झालं नाही, त्यामुळं त्यांचा गुदमरुन मृत्यू झालाय.
सहा जणांचा मृत्यू : प्रत्यक्षदर्शी कामगारानं दिलेल्या माहितीनुसार अकबर बिहारच्या मिर्झापूर इथले हे कामगार असून यातील दोन कामगारांना आपला जीव वाचवता आला. परंतु कंपनीत अडकलेले 6 जण भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अजून दोन जण या सर्वांचा गुदमरुन मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि आग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. या आगीवर तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवता आले.
हेही वाचा :