औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून शहराच्या नामकरणाबाबत केंद्राने हिरवा कंदील दिला. मात्र त्यातील शब्दांचा खेळ पाहता नाव बदल शहराचा केला की पूर्ण जिल्ह्याचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या पत्रकानुसार शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. त्यात जिल्हा औरंगाबाद असे नमूद करण्यात आले. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामध्ये दिलेले नाव औरंगाबाद तालुक्यापुरते मर्यादित आहे की, जिल्ह्याचे पूर्ण नाव बदलले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
-
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! pic.twitter.com/IfXbdFec7r
">➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! pic.twitter.com/IfXbdFec7r➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! pic.twitter.com/IfXbdFec7r
शिवसेना - भाजपकडून जल्लोष : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने दिल्यानंतर, जिल्ह्यात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. टीव्ही सेंटर भागात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री संदिपान भुमरे आणि भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. तर दुसरीकडे उद्धव गटाच्या नेत्यांनी मात्र बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या घोषणेनंतर जवळपास 35 वर्षांनी नामकरण प्रश्नावर केंद्राने पहिल्यांदा घोषणा केली. त्यावर भाजप, शिवसेना आणि ठाकरे गटाने आनंद व्यक्त केला.
संभाजीनगर या नावाची घोषणा : 9 मे 1988 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्ताव पाठवला होता. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केले. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो असे विधान परिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तर हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचचे आहे.
श्रेय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे : सर्वप्रथम बाळासाहेबांनीच संभाजीनगर नावाची भूमिका मांडली. त्यानंतर आम्ही 95 आणि 96 साली हा प्रस्ताव मान्य केला. मात्र न्यायालयात प्रकरण अडकले. लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराजांराचे नाव द्यावं हीच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. आम्ही श्रेयवादात पडणार नाही, पण बाळासाहेब ठाकरे यांची मागणी अनेक वर्षानंतर मान्य झाली. यामुळे केंद्र सरकारचे आभार असे मत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्ते केले.
या विरोधात विविध याचिका दाखल होत्या : याचिकेत काय म्हटले होते की, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत, 1998 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण धर्शिव करण्यात आले. हा निर्णय सरकारने 2001 मध्ये रद्द केला. राज्य सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय पूर्णपणे राजकीय असून, मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारचे. केवळ राज्यात सत्तापरिवर्तन झाले म्हणून नाव बदलण्याचा असा निर्णय घेता येणार नाही. नाव बदलण्याचा निर्णय हा घटनेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याचा 16 जुलैचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.