ETV Bharat / state

Case Registered Against Teacher: उत्तर पत्रिकेत अक्षर बदल प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल - Case Registered Against Teacher

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल झाल्या प्रकरणी दोन शिक्षकांविरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल भगवानसिंग उसारे आणि मनीषा भागवत शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. उत्तर पत्रिकेत अक्षर बदल असतानाही महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाला माहिती दिली नाही. तर वेळेत उत्तर पत्रिका तपासणी केली नसल्याने संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

Case Registered Against Teacher
दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : May 26, 2023, 10:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): यावर्षी बारावीच्या उत्तर पत्रिकांमधे मराठवाड्यातील काही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत अक्षर बदल आढळून आला. त्यावरून विद्यार्थ्यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले असता हे अक्षर आमचे नाही असे त्यांनी उत्तर दिले. सर्व उत्तर पत्रिकांमध्ये एकसारखे अक्षर आढळून आल्याने याप्रकरणी तपासणी करण्यात आली. त्यात पिंपळा व धनवट ता सोयगाव येथील राजकुमार कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक राहुल भगवानसिंग उसारे आणि मनीषा भागवत शिंदे यांना उत्तर पत्रिका तपासणीसाठी दिल्या असल्याचे चौकशीत आढळले. त्यांना त्या 13 मार्च 2023 पर्यंत तपासून देणे बंधनकारक असताना त्यांनी 8 एप्रिल 2023 रोजी परत दिल्या. त्यामुळे संशय आला.

अखेर गुन्हा दाखल: उत्तर पत्रिकेत अक्षर बदल असतानाही त्यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाला त्याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे संशय आल्याने गटशिक्षणाधिकारी रंगनाथ रेवबा आढाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोयगाव पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आता पोलीस तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी दोषी आढळल्यास शिक्षकांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

फिजिक्स उत्तर पत्रिकेत झाला बदल: मागील महिन्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपन्न झाली. यात विद्यार्थ्यांच्या फिजिक्सच्या उत्तरपत्रिकेत हस्ताक्षर बदल असल्याचा समोर आला. विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेत रिकामी जागा सोडली त्याठिकाणी असलेल्या रिकाम्या जागांवर दुसऱ्या अक्षरात उर्वरित उत्तर लिहिण्यात आली. याबाबत विद्यार्थ्यांना चौकशी केली असता, याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले. परीक्षा मंडळाने वेगवेगळ्या दिवशी 372 विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावले आणि सर्वांना आपापल्या उत्तर पत्रिका दाखवल्या. सर्वांच्या उत्तर पत्रिकेत हस्ताक्षर बदल होता आणि विशेष म्हणजे सर्वांचा फिजिक्स विषयाच्या उत्तर पत्रिकेतच हा बदल दिसून आला. त्यामुळे अनेक प्रश्न उभे झाले होते.

हेही वाचा:

  1. Thane crime: इंस्टाग्रामवर जुळले प्रेम; महिला कॉन्स्टेबला गुंगीचे पेय पाजून, जवानाने केला बलात्कार
  2. Koyta Gang Terror In Pune: पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा धुमाकूळ....कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड
  3. Thane crime: शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देण्याच्या नावाने ७५ लाखांचा गंडा; तिघांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.