ETV Bharat / state

कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाचे अपहरण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक अटकेत

author img

By

Published : Nov 21, 2019, 3:25 PM IST

पोलीस आयुक्तांकडे चल म्हणत पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 19 नोव्हें.) घडली. याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी एक जण अटकेत आहे तर तीघांचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसाचे अपहरण करताना महिला

औरंगाबाद - हेल्मट न घातल्याने माझ्या मुलाला का थांबवले असे म्हणत, कर्तव्य बजावणार्‍या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याची गच्ची धरुन, शिवीगाळ करुन अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. 19 नोव्हें.) घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी शेख आसिफ शेख मुख्तार (वय. 22 वर्षे, रा. देवळाई, बीड बायपास, सातारा परिसर) याला अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळ व माहिती देताना पोलीस निरीक्षक

शहर वाहतुक शाखेचे पोलीस नाईक लक्ष्मण शेषराव थोटे (वय 48 वर्षे) हे 19 नोव्हेंबरला रात्री 9 वाजेच्या सुमरास कार्तिकी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बाबा पेट्रोलपंपाकडून चारचाकी (क्र. एमएच 20 सीडी 8055) आली. कारमधून एक महिला व तीन व्यक्ती उतरले व थोटे यांच्याकडे गेले. कारमधून आलेल्या महिलेने तु माझ्या मुला-मुलीला हेल्मेट नसल्याने का थांबवले, असे म्हणत त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. तसेच थोटे यांना आयुक्तांकडे चल म्हणत धमकी देत बळजबरी कारमध्ये बसविले व गरमपाणी येथे एका घराकडे आणले. हा सर्व प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.

तेथे तीने मुलाला हेल्मेट विचारणारा पोलिसवाला हाच आहे का अशी विचारणा केली, त्यावर मुलाने नकार दिला. त्यानंतर महिला व इतर आरोपींनी थोटे यांना चल ठिक हे म्हणत तेथुन काढता पाय घेतला. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांची कॉलर धरणारी महिला फातेमा चाऊस आणि त्यासोबतचे दोन आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.

हेही वाचा - आर्थिक विवंचनेतून औरंगाबादेत उद्योजकाची आत्महत्या

Intro:हेल्मट न घातल्याने माझ्या मुलाला का थांबवले असे म्हणत, कर्तव्यबजावणार्‍या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याची कॉलर धरुन, शिवीगाळ करुन त्याला धमकी देत बळजबरी कारमध्ये बसवून अपहरण प्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तीघांपैकी एका आरोपीला अटक केली आहे. शेख आसिफ शेख मुक्तार (वय २२, रा. देवळाई, बीड बायपास, सातारा परिसर) असे आरोपीचे नाव आहे.

Body:शहर वाहतुक शाखेचे पोलिस नाईक लक्ष्मण शेषराव थोटे (वय ४८) हे १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमरास कार्तिकी सिग्नल जवळ कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बाबा पेट्रोलपंपा कडुन कार क्रमांक (एमएच-२०-सीडी-८०५५) आली. कारमधुन एक महिला व तीन व्यक्ती उतरले व थोटे यांच्याकडे आले.
कारमधुन आलेल्या महिलेने तु माझ्या मुला-मुलीला हेल्मेट नसल्याने का थांबवले म्हणत त्यांची कॉलर पकडुन शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केला त्या नंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. तसेच थोटे यांना आयुक्तांकडे चल म्हणत धमकी देत बळजबरी कारमध्ये बसविले व गरमपाणी येथे एका घराकडे आणले. तेथे तीने मुलाला हेल्मेट विचारणारा पोलिसवाला हाच का अशी विचारणा केली. त्यावर मुलाने नकार दिला. त्यानंतर महिला व इतर आरोपींनी थोटे यांना चल ठिक हे म्हणुन तेथुन काढता पाय घेतला. प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे पोलिसांची कॉलर धरणारी महिला आणि त्यासोबतचे दोन आरोपी आद्यप फरार असून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती क्रांतिचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळूखं यांनी दिली.

बाईट-उत्तम मुळूख,
पो.निरीक्षक क्रांतिचौकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.