छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : मोढा बुद्रुक कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत हिंदू जनजागरण सभा घेण्यात आली. सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी कालीचरण महाराज यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. आयोजकांनी चिथावणी दिली. सभेचे नियम व अटींचे पालन केले. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथे शनिवारी रात्री झालेल्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपने आरोप फेटाळले : कालीचरण महाराज सिल्लोडचे भाजप शहराध्यक्ष, सभेचे आयोजक कमलेश कटारिया, नियोजन समितीचे अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते सुनील जाधव आणि आरएसएसचे बौद्धिक जिल्हाप्रमुख केतन कल्याणकर विरुद्ध पोलिस कर्मचारी यतीन कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करणे चुकीचा आहे, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
|
राजकीय नेत्यांच्या दबावापोटी कारवाई : सभा झाली आणि त्यानंतर सर्व लोक निघून गेले कुठलाही अनुचित प्रकार तालुक्यात किंवा जिल्ह्यात घडलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. त्यात पोलिसांनीही याबाबतीत काही माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीचे जनजागरण कार्यक्रम गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यात घेण्यात येत आहेत. त्यातून फक्त काही धार्मिक कार्यक्रमात होतात. मात्र यावेळेस दबावापोटी हा गुन्हा दाखल केला, असा आरोप भाजपचे पदाधिकारी कमलेश कटारिया यांनी केला आहे. परंतु अशा कारवायांना न घाबरता धर्मजागृती मोहिम सुरूच ठेवू असे त्यांनी सांगितले.