छत्रपती संभाजीनगर : खासगी बस आणि ट्रकच्या झालेल्या अपघातात बसमधील तब्बल 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना समृद्धी महामार्गावरील सावंगीजवळ रात्री उशीरा घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खुराणा ट्रॅव्हल्सची ही बस असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आणि बसचा अपघात झाला आहे.
अपघातात 18 प्रवासी जखमी : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात तब्बल 25 नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने समृद्धी महामार्गाबाबत मोठी टीका करण्यात आली होती. तो अपघात झाल्यानंतरही समृद्धीवर अपघाताची मालिाक सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर लोखंडी सळया वाहून नेणाऱ्या ट्रक आणि खासगी प्रवाशी बस यांच्यात मंगळवारी रात्री उशीरा अपघात झाला आहे. या अपघातात 18 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
बसचालकाने दिली ट्रकला धडक : बुधवारी सकाली दोन वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर लोखंडी सळया भरुन जाणारा ट्रक ( क्रमांक एसएच 21 बीएच 3516 ) हा दुसऱ्या लेनमधून जालना ते सूरत असा जात होता. तर लक्झरी बस क्रमांक ( एमएच 38 एक्स 8027 ) ही नागपूर ते पुणे जात असताना चालकाने पाठीमागून चालत्या ट्रकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. बसने धडक दिल्याने बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला. यावेळी बसमधील तब्बल 18 प्रवाशी जखमी झाले. बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. यावेळी जखमींना छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना मेडिकोर रुग्णायलयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात सहा प्रवाशी गंभीर जखमी : खुराणा ट्रॅव्हल्सच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रवाशांना मोठी दुखापत झाली आहे. यात 18 प्रवाशी जखमी झाले, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जखमी नागरिकांमध्ये 1) प्रज्वल संजय शेंडे वय 24 वर्ष 2 ) विक्रांत रामनाथ नेवारे वय 34 दोघे राहणार नागपूर 3) चेतन नमृतवार 4) वर्षा भावे गंभीर जखमी असून पायास गंभीर दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून मेडिकोर हॉस्पीटल येथे दाखल केले आहे. तर काही गंभीर जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे. एकूण 10 दहा प्रवासी गंभीर जखमी आहेत तर 8 प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. लक्झरी बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते. बससोबत दोन चालक आणि एक क्लिनर असे तिघेजण होते. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सहा गंभीर जखमींचे नावे मिळाले नाहीत, त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
लक्झरी बसमधील गंभीर जखमींची नावे :
- दिशा वाजरणी ( वय 51 वर्ष )
- अंजली झुमारे ( वय 43 वर्ष )
- अतूल झुमारे ( वय 41 वर्ष )
- भावेश वजराणी ( 25 वर्ष )
- शेख युनुस वय ( बस चालक, 34 वर्ष )
हेही वाचा -