ETV Bharat / state

दारु आणण्याच्या वादातून तरुणाची डोक्यात विट टाकून निर्घुण हत्या - डोक्यात विट टाकून निर्घुण हत्या

दारू आणण्यावरुन वाद झाल्याने दोन मित्रांनी तरुणाची निर्घुण हत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास कांचनवाडी भागात घडली. महेश दिगंबर काकडे (वय 18 वर्षे, रा. नक्षत्र पार्क, कांचनवाडी), असे मृत तरुणाचे नाव आहे.

न
author img

By

Published : Sep 13, 2021, 10:38 PM IST

औरंगाबाद - दारू आणण्यावरुन वाद झाल्याने दोन मित्रांनी तरुणाची निर्घुण हत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि. 12 सप्टेंबर) रात्री दहाच्या सुमारास कांचनवाडी भागात घडली. महेश दिगंबर काकडे (वय 18 वर्षे, रा. नक्षत्र पार्क, कांचनवाडी), असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांच्या सोमवारी (दि. 13 सप्टेंबर) पहाटे मुसक्या आवळल्या. विकास नंदू राटवाड आणि संदीप उर्फ गुज्जर दारासिंग मुळेकर (दोघेही रा. कांचनवाडी), अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

कांचनवाडी येथील महेश काकडे याने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. लॉकडाऊनच्या काळात तो एका हॉटेलात नोकरीला होता. त्याचे वडील एका कंपनीत कामाला आहेत. लॉकडाऊननंतर त्याने हॉटेलातील काम सोडले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तो गेवराई तांडा येथील एका कंपनीत कामाला लागला. 11 सप्टेंबर रोजी महेशचा पगार झाला होता. रविवारी (दि. 12 सप्टेंबर) सकाळी तो बाजारात जाऊन येतो, असे सांगत घराबाहेर पडला होता. त्यानंतर सायंकाळी त्याने वडिलांना सांगितले की, मी मित्रांसोबत सिल्लोडला जात आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी घरी पोहोचेल. मात्र, तो पाच ते सहा मित्रांसोबत दारू पिण्यासाठी गेला. कांचनवाडीतील एका इमारतीमध्ये महेशने विकास व संदीप यांच्यासह काही मित्रांसोबत दारु रिचवली. दारू संपल्यानंतर आणखी पिण्यासाठी विकास व संदीप यांनी महेशकडे पैशांची मागणी केली. दारू घेण्यासाठी इमारतीतून खाली असलेल्या दारुच्या दुकानासमोर आले. त्यावेळी महेशने दोघांनाही तुम्ही जास्त पिता त्यामुळे तुम्हीच दारु घ्या, असे म्हणाला. त्यावरुन तिघांमध्ये प्रचंड वाद झाला. विकास आणि संदीपने दारु घेण्यास नकार देत महेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी महेशचे विटेने डोके फोडत चेहऱ्याचा चेंदामेंदा केला. तोपर्यंत उर्वरीत मित्रांनी तेथून पळ काढला होता. महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्यांनी तेथून दोघांनी पळ काढला.

गॅरेज चालकांनी दिली कुटुंबियांना माहिती

या घटनेनंतर परिसरातील गॅरेज चालक रवी हर्षे यांनी महेशच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर महेशच्या कुटुंबीयांनी तात्काळ धाव घेत त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, महेश ज्या हॉटेलात कामाला होता. त्याच हॉटेलातील एका मित्राने सिल्लोडला जाण्यासाठी हॉटेल मालकाकडून पाचशे रुपये घेतले होते. त्यानंतर पाच ते सहा मित्रांसोबत महेश दारु पिण्यासाठी गेला असावा, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली.

हेही वाचा - मृत्यू प्रमाणपत्र न दिल्याने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची अधिकाऱ्यांना तंबी; पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.