औरंगाबाद - पैठण तालुक्यातील थेरगाव येथील तीन वर्षीय चिमुरड्याला विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. चॉकलेट आणण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. स्वराज दिगांबर काळे, असे या चिमुरड्याचे नाव आहे.
हेही वाचा- सोपान महाराजांवर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रायणी घाटावर अंत्यसंस्कार
स्वराज दुपारी शाळेतून घरी आला. खेळत-खेळत तो जवळच असलेल्या किराणा दुकानातून चॉकलेट आणण्यासाठी जात होता. दरम्यान त्याला रस्ताच्या कडेला बसलेल्या विषारी सापाने दंश केला. त्यानंतर त्याने रडण्यास सुरुवत केली. मला काहीतरी चावले आहे, असे त्याने सांगिलते. नागरिकांनी आजूबाजूच्या पाहिल्यानंतर त्यांना साप दिसला. नागरिकांनी स्वराजला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर पाचोडसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.