औरंगाबाद - सिल्लोड तालुक्यातील डोंगरगावमध्ये तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या दोघींचा मृतदेह सोमवारी गावाजवळील एका विहिरीत आढळून आला.
हेही वाचा - चंद्रकांत पाटील म्हणतात.. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन नाहीच, मात्र...
१५ फेब्रुवारीला मृतक महिलेच्या आईने मुलगी आणि नात बेपत्ता झाल्याची तक्रार सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यानंतर सोमवारी या दोघींचाही मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक किरण बिडवे तपास करीत आहेत.
हेही वाचा - भारतीय सैन्यात महिलांना देता येणार कायम सेवा; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
या मायलेकीचा खून झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहांचे शवविच्छेदन करणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता. औरंगाबादमध्ये शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात येईल तसेच खून झाला असल्यास आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल, या आश्वासनानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास नातेवाईकांनी होकार दिला.