ETV Bharat / state

कोरोना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो, माझ्याशी नाही - चंद्रकांत पाटील

लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर राज्य सरकारकडून सतत टीका करण्यात येते. मात्र, दुसरीकडे सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले जात आहे. याला काय म्हणावे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साधला.

c
c
author img

By

Published : Sep 4, 2021, 8:42 PM IST

औरंगाबाद - कोरोनाची तिसरी लाट येईल का याबाबत सांगण्यासाठी मी उद्धवजी सारखा डॉक्टर किंवा संजय राऊत सारखा कंपाउंडर नाही. कोरोना फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी नाही, अशी खोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

बोलताना चंद्रकांत पाटील

लसीकरण बाबत केंद्रांवर टीका तरी महाराष्ट्र अव्वल

लसीकरणाबाबत केंद्र सरकारवर राज्य सरकारकडून सतत टीका करण्यात येते. मात्र, दुसरीकडे सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले जात आहे. याला काय म्हणावे, असा निशाणा चंद्रकांत पाटील यांनी साधला. चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर आले असून त्यांनी शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट घेतली. त्यावेळी जगदीश सिद्ध या कार्यकर्त्यांच्या घरी भेट देत असताना नागरिकांशी संवाद साधत त्यांनी सरकारवर टीका केली.

शाळा सुरू करणे गरजेचे

माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरीभाऊ बागडे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी केली. ही मागणी योग्य असून मानसोपचार तज्ज्ञांनीही इशारा दिला आहे, की आता अधिक काळ शाळा बंद राहिल्या तर मुलांच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने आता शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - राजू शेट्टींनी केलेले वक्तव्य आमच्यासाठी नसावं - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.