ETV Bharat / state

सिल्लोड: सहायक निबंधक कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजप आक्रमक - भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारीया

सिल्लोड शहरातील सहायक निबंधक कार्यालयाच्या विरोधात नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत होत्या. याची दखल घेत आज सिल्लोड शहर भाजपतर्फे सहायक निबंधक चटलावार यांना धारेवर धरण्यात आले.

BJP is aggressive against the mismanagement of the Assistant Registrar's Office Sillod
सहायक निबंधक कार्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात भाजप आक्रमक
author img

By

Published : Feb 24, 2021, 8:45 PM IST

सिल्लोड - सिल्लोड शहरातील सहायक निबंधक कार्यालयाच्या विरोधात नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत होत्या. याची दखल घेत आज सिल्लोड शहर भाजपतर्फे सहायक निबंधक चटलावार यांना धारेवर धरण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारीया यांच्या सहित नगरसेवक मनोज मोरेल्लू, किरण पवार, बार कौंसिलचे अध्यक्ष अ‌ॅड अशोक तायडे, शहर कार्यकारिणीतील निमंत्रित सदस्य विष्णू काटकर, शहर सरचिटणीस मधुकर राऊत, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अरुण राठोड, शहर कोषाध्यक्ष प्रकाश भोजवानी गजानन माळकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारीया

नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले-

सिल्लोड शहरासह १२८ खेड्यांचा कारभार शहरातील निबंधक कार्यालयात चालतो. वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे कामे खोळंबून पडतात. मागील आठवड्यात देखील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस काम बंद होते. लोकांना सतत चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे सिल्लोड शहरातील मालमत्ते संदर्भात खरेदी-विक्री दस्त नोंदणी होतांना नगरपरिषदेच्या नमुना नंबर ४३ ची मागणी करण्यात येते. मुळात नमुना नंबर ४३ हे केवळ कराचे प्रमाणपत्र आहे. त्यावरून कुठलाही मालकी हक्क सिद्ध होत नाही. असे असतांना देखील नागरिकांना नगरपरिषदेच्या चकरा व्हाव्या या हेतूने त्यांचा छळ चालू आहे. अगोदरच नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत. दोन-दोन महिने चकरा मारून देखील लोकांना नमुना नंबर ४३ व झोन प्रमाणपत्र उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सर्व व्यवहार अडकून पडले आहेत.

अवैध प्लॉटिंगचा सुळसुळाट-

सोबतच शहरात अवैध प्लॉटिंगचा सुळसुळाट झाला आहे. परवानगी नसतांना अनेक ठिकाणी अवैध प्लॉटिंग व बांधकाम चालू आहे. सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराचा कमाई घरासाठी जागा घेण्यात आणि बांधकाम करण्यासाठी खर्च करतो. त्यानंतर व्यवहार पूर्ण झाल्यावर जागा अवैध असल्याचे त्याला कळते. त्यावेळेस तो हतबल होतो या सर्व बाबी लक्षात घेता नमुना नंबर ४३ ची सक्ती न करता दस्त नोंदणी करावी, या प्रमुख मागणीसह कार्यालयातील तांत्रिक बाबींमुळे नागरिकांची कामे थांबू नयेत. अवैध प्लॉटिंग, रो हौसेस, फ्लॅट यांची दस्त नोंदणी बंद व्हावी. अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली सोबतच दस्त नोंदणी लागणारी सर्व माहिती व मार्गदर्शक तत्वे याचा माहिती फलक दर्शनी भागात लावण्यात यावा, अशी सूचनाही करण्यात आली. या विषयावर तात्काळ पाऊले न उचलल्यास भाजपा तर्फे आंदोलनाचा ईशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनाचा इशारा-

गेल्या काही वर्षांपासून सहायक निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून या कार्यालयात मोठ्या प्रमाणात दलालाचा सुळसुळाट झाला. अधिकारी व दलाल मिळून सर्व सामान्य जनतेचे आर्थिक शोषण करीत आहे. या विषयावर तात्काळ पाऊले न उचलल्यास भाजपा तर्फे आंदोलनाचा ईशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा- रुग्ण वाढ सुरुच; बुधवारी राज्यात 8807 नवीन कोरोनाबाधित, 80 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.