औरंगाबाद - शासनाच्या वतीने राज्यातून मजूरीच्या निमित्ताने आलेल्या मजूरांसाठी राहण्याची व्यवस्था कन्नड येथे करण्यात आली आहे. या मजूरांच्यामध्ये कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याचा उपक्रम पार पडला. मौजे रेल येथील दिलीप बिल्डकॉन लि. या कंपनीच्या वतीने 303 मजूरांसाठी कोरोना कोविड 19 च्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिग कशी ठेवावी याबाबत कन्नडचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहलिदार संजय वारकड, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मजूरांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमही सादर झाले.
तालुक्यातील कलाकार तोताराम पवार यांनी मिमीक्री करुन मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. तर योगेश पाटील यांनी शायरी, गायन करुन मजूरांचे मनोरंजन केले. यामुळे सध्याच्या तणावाच्या परिस्थितीतही मजूरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
या कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, तालुका आरोग्य अधिकारी लांजेवार, नायब तहसिलदार शेख हारून, अ.का. सत्यजीत आव्हाड, तलाठी ए एल सुरपाम, विकास वाघ, ग्रामसेवक रमणे व दिलीप बिल्डकॉन लि.चे दुश्यन्त शर्मा इ. सह मजूर उपस्थित होते.