ETV Bharat / state

Abu Azmi : औरंगजेब वाईट नव्हता- अबू आझमी

सपाचे आमदार अबू आझमी (SP MLA Abu Azmi ) यांनी मुक्ताफळे उधळली असून औरंगजेब वाईट नव्हता ( Aurangzeb was not bad ). त्यांचा चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जातो आहे. खरा इतिहास दाखवला तर हिंदूही नाराज होणार नाहीत, असे वादग्रस्त विधान ( controversial statement of Abu Azmi ) केले आहे. राज्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

Abu Azmi
अबू आझमी
author img

By

Published : Aug 6, 2022, 11:04 PM IST

मुंबई - औरंगाबाद शहराच्या राजे संभाजीनगर नामांतरानंतर ( Rename the city of Aurangabad to Raje Sambhajinagar ) राज्यात वादंग निर्माण झाला आहे. सपाचे आमदार अबू आझमी (SP MLA Abu Azmi ) यांनीही मुक्ताफळे उधळली असून औरंगजेब वाईट नव्हता ( Aurangzeb was not bad ). त्यांचा चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जातो आहे. खरा इतिहास दाखवला तर हिंदूही नाराज होणार नाहीत, असे वादग्रस्त विधान ( controversial statement of Abu Azmi ) केले आहे. राज्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

तर हिंदू नाराज होणार नाहीत - भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदूंवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला. यावर अबू आझमी यांनी देशात हिंदूंवर हल्ला होत आहे तसेच, मुस्लिम बांधवांवर देखील हल्ले होत आहेत. नितेश राणे यांनी धर्माच्या नावावर मंदिर-मस्जिद यावर भाडकवण्याचे काम करू नये, असे आझमी यांनी बजावले. औरंगजेब बादशहा वाईट राजा नव्हते. त्यांचा चुकीचा इतिहास दाखवला जातोय. औरंगजेब यांचा खरा इतिहास दाखवला तर हिंदू नाराज होणार नाहीत. अनेक लोकांची नावे औरंगजेब आहेत. औरंगाबाद मध्येही औरंगजेब अशी नावे आहेत. 36 जिल्ह्यांतील तीन जिल्ह्याची नावे उस्मानाबाद, अहमदनगर, औरंगाबाद असल्याचे आझमी म्हणाले.

नावे बदलल्याने कोणाला नोकरी मिळणार नाही- तीन जिल्ह्यांची नावे बदलल्याने कोणाला नोकरी मिळणार नाही, महागाई कमी होत नाही. जिल्ह्यांची नावे बदलून तरुणांना नोकरी मिळत असेल तर नाव बदलल्याचे स्वागत करेन, असे आझमी म्हणाले. तसेच देशातील वाढत्या महागाई, बेरोजगारीकडे लक्ष वेधले. श्रीलंकेप्रमाणे देशाची स्थिती होऊ नये, असेही आझमी म्हणाले.

हेही वाचा - Mission Zero Drop Out Campaign : मुंबईत अडीच हजारांहून अधिक आढळली शाळाबाह्य मुले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.