मुंबई : औरंगाबादचे नामांतर होऊन छत्रपती संभाजी नगर असे करण्यात आले आहे. आधी राज्य सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने देखील राज्य सरकारच्या या निर्णयाला देत औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर नामांतरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. औरंगाबाद शहराचे, जिल्ह्याचे छत्रपती संभाजी नगर असे नामांतर झाल्यानंतर तमाम संस्थाने राजकीय नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
उपोषणात औरंगजेब पोस्टर : केवळ राजकीय हेतू समोर ठेवून अशा प्रकारची नामांतरण केली जात असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या नामांतराच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजी नगर येथे साखळी उपोषणाला सुरुवात केली. मात्र हे उपोषण सुरू असताना एमआयएमकडून थेट उपोषणात औरंगजेब याचेच पोस्टर झळकवण्यात आले. औरंगजेबचे पोस्टर झळकावल्यानंतरही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस खाते या विरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत.
एमआयएम,भाजपची मिली बघत : त्यामुळे राज्यामध्ये एमआयएम, भारतीय जनता पक्षाची मिली बघत आहे हे स्पष्ट होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुरज चव्हाण यांनी केला आहे. याआधीही वेळोवेळी राजकीय समीकरण लक्षात घेता भारतीय जनता पक्षाला मदत होईल असेच काम एमआयएम पक्षाने भूमिका घेतली असल्याचाही सुरेश चव्हाण म्हणाले आहेत.
भाजपाचा एमआयएमला पाठींबा : एमआयएम पक्षाने संकट काळात नेहमीच भारतीय जनता पक्षाला मदत केली आहे. सामाजिक एकता बिघेडेल अशी वक्तव्य नेहमीच एमआयएम पक्षाकडून केली जातात. पण त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे भाजपाचा या कृत्याना पाठिंबा आहे. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा.
राष्ट्रवादीचा गंभीर आरोप : ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष आधी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उदगीरमध्ये जाहीर सभेत आपला गळा कापला तरी वंदे मातरम म्हणणार नाही असे, वक्तव्य केले होते. त्यावेळेसही गृहमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. आता थेट एमएमचे खासदार इम्तियाज जलील हे करत असलेल्या साखळी उपोषणादरम्यान औरंगजेबचा पोस्टर झळकवण्यात आलेला आहे. तरीदेखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे एमआयएम पक्षाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचा सुरज चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - Vivek Ramaswamy : वंश, लिंग आणि हवामानामुळे अमेरिका अडचणीत आली आहे - विवेक रामास्वामी