औरंगाबाद - जिल्ह्यात गुरुवारी सकाळी 35 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 1397 झाली आहे. तर मृतांची संख्या 64 वर पोहोचली आहे.
नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये बायजीपुरा (1), मिसारवाडी (1), वाळूज महानगर एक, बजाज नगर (1), संजय नगर (1), शहागंज (1), हुसेन कॉलनी (1), कैलास नगर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (2), उस्मानपुरा (1), इटखेडा (1), एन-4 (3), नारळीबाग (2), हमालवाडी (4), रेल्वे स्टेशन परिसर (2), सिटी चौक (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), साई नगर एन सहा (1), संभाजी कॉलनी, एन सहा (2), करीम कॉलनी रोशन गेट (1) अंगुरी बाग (1), तानाजी चौक, बालाजी नगर (1), एन अकरा हडको (1), जय भवानी नगर (2), अन्य (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 14 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यांत आतापर्यंत 867 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बुधवारी औरंगाबाद शहरातील मनपाच्या कोविड केअर केंद्र असलेल्या एमजीएम स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथून आठ, एमआयटी मुलांचे वस्तीगृह येथून नऊ, किल्लेअर्क येथून 14, घाटी येथून 6, जिल्हा सामान्य रुग्णालयातून 12, खासगी रुग्णालयातून सात असे एकूण 56 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातून 867 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असे मनपा प्रशासनाने कळवले आहे. तर बुधवारी घाटीत तीन, खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे मृतांची संख्या 64 झाली आहे. घाटीत शहरातील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनीतील 38 वर्षीय पुरूष आणि रहीम नगर येथील 55 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात मकसूद कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष, मानक नगर, गारखेडा परिसर, विजय नगर येथील 76 वर्षीय महिला आणि रोशन गेट येथील 64 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात आतापर्यंत सात, घाटीत 56 आणि मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 64 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.