औरंगाबाद - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 26 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. या संख्येसह एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 569 इतकी झाली आहे. यापैकी 1 हजार 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 72 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्य घडीला 468 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोमवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नवी वस्ती, जुना बाजार (2), चिस्तीया कॉलनी (2), उस्मानपुरा (1), एन आठ सिडको (2), भवानी नगर (4), शिवशंकर कॉलनी (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आझम कॉलनी (4), एन सहा सिडको (1), युनूस कॉलनी (1), मुकुंदवाडी (1), मिसरवाडी परिसर (1), नारेगाव (1), रेहमनिया कॉलनी (1), वैजापूर (2) या भागातील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये 13 महिला आणि 13 पुरुष आहेत.
रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. रविवारी दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. निजामगंज येथील 52 वर्षीय महिलेचा, किराडपुरा येथील 62 वर्षाच्या महिला रुग्णाचा तर जुना बाजार भागातील 72 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या 72 वर पोहोचली आहे.
हेही वाचा - कामगारांना मदत करा अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या होतील, युवासेनेची केंद्राला मागणी
हेही वाचा - माझा फोन टॅप केला जातोय, मला संपर्क करू नका; हर्षवर्धन जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन