ETV Bharat / state

अमृतसर ते औरंगाबाद रेल्वे अपघातांची मालिका ...असा गेला निष्पापांचा जीव

author img

By

Published : May 8, 2020, 10:52 AM IST

Updated : May 8, 2020, 7:10 PM IST

शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाड दरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीला त्यांचा अंदाज आला नाही. यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे. खरंतर, देशभरात याआधी देखील रेल्वेने चिरडण्याचे प्रकार घडले आहेत. त्याबद्दल...

aurangabad railway accident
अमृतसर ते औरंगाबाद...रेल्वेखाली चिरडण्याची मालिका कायम!

औरंगाबाद - शुक्रवारी पहाटे बदनापूर ते करमाड दरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे मजूर गावी निघाले होते. रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी जात असताना प्रवासादरम्यान ते औरंगाबदजवळ बदनापूर - करमाड दरम्यान पोहोचले. रात्र झाल्याने सर्वजण तिथेच रुळावर झोपले होते; आणि झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीला रुळावर झोपलेल्या मजूरांचा अंदाज आला नाही. यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर आहे. खरंतर, देशभरात याआधी देखील रेल्वेने चिरडण्याचे प्रकार घडले आहेत. त्याबद्दल...

railway accident
बदनापूर ते करमाड दरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशीच काळाचा घाला

अमृतसरमध्ये दसऱ्याच्या दिवशी ६२ ग्रामस्थांवर काळाने घाला घातला. रावण दहनाच्या कार्यक्रमावेळी जमाव रेल्वे रुळावर आला. संबंधित दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच जोडा या फाटक या ठिकाणी रेल्वेने ६२ जणांना चिरडले; आणि ७२ नागरिक गंभीर जखमी झाले होते.

धमरा घाट अपघात

बिहारच्या खगरिया जिल्ह्यात भरधाव एक्सप्रेसने कंवारा भाविकांना चिरडले होते. यामध्ये ३७ भाविकांचा मृत्यू झाला. धर्मा घाट स्थानकाजवळ हे भाविक ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित प्रकार घडला. याचप्रमाणे २०१८ मध्ये कैमीर जिल्ह्यात एका रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. सर्व अपघातग्रस्त रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार घडला.

'विजयनगरम'मध्ये अफवेमुळे १० जण चिरडले

केरळच्या अॅलेप्पी ते झारखंडमधील धनबाद जिल्ह्याकडे जाणाऱ्या बोकरो एक्सप्रेसने आंध्र प्रदेशमध्ये दहा लोकांना चिरडले होते. काही प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यात आग लागल्याच्या अफवेमुळे गोतलाम स्थानकाजवळ चेन खेचली. अफवेच्या भीतीने काहीजण रेल्वेतून खाली उतरले. रात्रीची वेळ असल्याने उपस्थितांना समोरुन रायगाडा-विजयवाडा पॅसेंजर येत असल्याचे दिसले नाही. या दुर्घटनेत दहा जाणांचा जागीच मृत्यू झाला.

railway accident
उत्तर प्रदेशमधील अपघात

उत्तर प्रदेशमधील अपघात

उत्तर प्रदेशच्या इतवाह येथे भरधाव राजधानी एक्सप्रेसने चार जणांना उडवले होते. यामध्ये सर्व अपघातग्रस्तांचा मृत्यू झाला होता. याच प्रमाणे २०१८ मध्ये रेल्वे कामगारांचा देखील अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले होते. हरदोई जिल्ह्यात काही कामगार रुळावर काम करत असताना भरधाव रेल्वेने त्यांना चिरडले. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता.

केरळ

२०१३ मध्ये जनशताब्दी एक्सप्रेसने रेल्वे ट्रॅक वर उभ्या असणाऱ्या तिघांना चिरडले होते. त्रिवंद्रम ते कोझिकोड जाणाऱ्या रेल्वे अपघातात तिघे मृत्यूमुखी पडले. तिरुवअनंतपुरममध्ये घडलेल्या घटनेत एकजण गंभीर जखमी होता.

Last Updated : May 8, 2020, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.