ETV Bharat / state

लोकसभेच्या पार्श्वभूमिवर १०२ जणांवर तडिपारीची कारवाई होणार - तडीपार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी महिनाभरात ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे माहिती देताना
author img

By

Published : Mar 25, 2019, 6:33 PM IST

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी महिनाभरात ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. येत्या आठवडयात १०२ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.

सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे माहिती देताना

मागील वर्षभरात औरंगाबाद शहर अनेक दंगलीने गाजले. तर २० पेक्षा अधिक हत्या झाल्याच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेता येत्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न उदभवता निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडावी, यासाठी शहर पोलीसांच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे. याचा उपाय म्हणून शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.

या यादीमध्ये कुख्यात गुंड व अवैध धंदे करणारे गुन्हेगारांचा समावेश आहे. अशा सुमारे १ हजार पेक्षा अधिक गुन्हेगारांचा समावेश या यादीमध्ये करण्यात आला आहे. त्यापैकी ९०० पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर १०२ कुख्यात गुंडांना शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. येत्या आठवडा भरात १०२ सराईतांना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे. अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली.

Intro:लोकसभा निवडणुकीच्या पर्शवभूमीवर औरंगाबाद शहर पोलिसांनी गुन्हेगारांवर जम्बो कारवाईला सुरुवात केली असून महिनाभरात 900 पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून शहरातील 100 पेक्षा अधिक हिस्ट्रीसीटर चे ताडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून येत्या आठवडयात 102 जणांवर ताडीपारी ची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी दिली आहे.

Body:मागील वर्षभरात औरंगाबाद शहर अनेक दंगलीने गाजले आहेत तर 20 पेक्षा अधिक हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.हीच बाब लक्षात घेता.येत्या लोकसभा निवडणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न न उदभवता निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पाडावी यासाठी शहर पोलीस दलाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची त्यांच्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता यादी तयार करण्यात आली होती.या मध्ये छुटपुट भाई-दादा , अनेक गंभीरगुन्हे असलेल्या कुख्यत गुंड व अवैध धंदे करणारे गुन्हेगारांचा समावेश आहे. आशा सुमारे एक हजार पेक्षा अधिक गुन्हेगाराचा यादी मध्ये समावेश होता .त्या पैकी 900 पेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर 102 कुख्यत गुंडांना शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे येत्या आठवडा भरात 102 सराईताना शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.