औरंगाबाद- क्रांतीचौक पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जेरबंद केले आहे. समाधान लिंबाजी जायभाये असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. पोलिसांनी या चोरट्याने पळविलेली रिक्षा जप्त केली आहे.
समतानगरातील रिक्षाचालक अफरोज फैय्याज कुरेशी (२४) याने १ जुलै रोजी रात्री त्याची रिक्षा (एमएच-२०-ईएफ-१९४५) आधार रुग्णालयासमोर उभी केली होती. मध्यरात्री जायभायेने बनावट चावीचा वापर करून अफरोज यांची रिक्षा पळविली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर कुरेशी यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, उपनिरीक्षक संदीप शिंदे आणि हनुमंत चाळणेवाड यांनी रिक्षाचा शोध घेण्यास सुरूवात केली. याप्रकरणी पोलिसांनी जायभायेला रांजणगावातून अटक केली. तपासादरर्म्यान जायभाय हा अट्टल रिक्षाचोर असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी चोरास २४ तासात अटक केली आहे.