औरंगाबाद : सातारा परिसरात कांचनवाडी भागात आरोपी समीर मस्के आपल्या पत्नी आणि मुलासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून समीर पत्नी आरतीच्या चारित्र्यावर सतत संशय (Murder on suspicion) घेऊन भांडत होता. (husband killed little son along with wife) त्यातच रविवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात समीरने दोरी आणि मोबाईल चार्जर वायरच्या साह्याने आरतीचा गळा आवळून खून केला (Aurangabad Murder Case). त्यानंतर त्याने आपल्या अडीच वर्षांचा मुलगा निशांत याचा देखील गळा आवळून खून केला. रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले. त्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना या घटनेची माहिती (Husband Arrested in murder case) दिली. (Aurangabad Crime)
पोलिसांनी घेतली घटनास्थळी धाव : समीरने 112 या टोल फ्री क्रमांक वर फोन करून सातारा पोलिसांना घडलेली घटना सांगितली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. आरोपीला ताब्यात घेत सातारा पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. इतकच नाही तर याप्रकरणी आरोपी पती समीरच्या आई विरोधात देखील गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. या घटनेत आईचा काय सहभाग आहे, याबाबत अद्याप पोलिसांनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी, याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल अशी माहिती सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.