ETV Bharat / state

औरंगाबाद : एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू - औरंगाबाद यश नरसिंहराव गंगापूरकर आत्महत्या न्यूज

एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

औरंगाबाद एमबीबीएस विद्यार्थी आत्महत्या न्यूज
एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Jan 2, 2021, 2:34 PM IST

Updated : Jan 2, 2021, 2:51 PM IST

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या यश नरसिंहराव गंगापूरकर या विद्यार्थ्याने विषप्राशन केल्याची घटना ३१ तारखेला घडली.दरम्यान त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला तीन दिवसांपासून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते.दरम्यान शुक्रवारी (ता.१) रात्री १२ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची विष घेऊन आत्महत्या

हेही वाचा - लसीकरणानंतर सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे बंधनकारक आहे का?, आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

अधिक माहिती अशी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश गंगापूरकर हा गेल्या दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस चे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो बेगमपुरा येथील ब्राम्हण गल्ली येथे त्याच्या आईसोबत खोली घेऊन राहत होता. त्याने २५ डिसेंबरला घाटी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार करून तो घरी गेला होता.

दुसऱ्या दिवशी त्याने राहत्या घरी दुपारी ११ च्या सुमारास विषप्राशन केले. हा प्रकार घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तीन दिवस उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही

यशचा विषप्राशन करून मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्रांसह मोबाईलमध्ये झालेल्या संभाषणाची कसून तपासणी केली. तसेच, त्याच्या महाविद्यालयातील शिक्षकांकडून तो तणावात होता का याची माहिती घेतली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे तपास अधिकारी राजकुमार जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा - अन् पोलिसाने 'त्या' वृद्ध व्यक्तीला मरणाच्या दारातून बाहेर काढलं..पाहा व्हिडिओ..

Last Updated : Jan 2, 2021, 2:51 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.