ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राद्वारे जामीन मंजूर करुन घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Aurangabad police

बनावट कागदपत्र सादर करुन आरोपींचे जामीन घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश औरंगाबाद गुन्हे शाखेने केला आहे. औरंगाबाद आणि मुंबई येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली असून 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राद्वारे जामिन मंजूर करवून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
author img

By

Published : Nov 8, 2019, 1:14 PM IST

Updated : Nov 8, 2019, 2:03 PM IST

औरंगाबाद - बनावट कागदपत्र सादर करुन आरोपींचे जामीन घेणाऱ्या टोळीचा औरंगाबाद गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. औरंगाबाद आणि मुंबई येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली असून 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचे समोर आले आहे. ही माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

औरंगाबादमध्ये बनावट कागदपत्राद्वारे जामिन मंजूर करवून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

हेही वाचा - महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर १० लाखांचा गुटखा जप्त; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

जामीन घेण्यासाठी बनावट दस्तावेज टोळीने तयार केले होते. जमीनदार विश्वासाचे दिसावे यासाठी आरोपी महिलांनासोबत घेऊन कुटुंब असल्याचे दाखवून विश्वास संपादन करायचे. एका जामिनासाठी 5 ते 15 हजार तर आरोपी आर्थिक क्षमता मजबूत असेल तर 50 हजारांपर्यंत देखील पैसे घेतले जात होते.

औरंगाबाद गुन्हे शाखेला निनावी तक्रारदाराने याबाबत तक्रार केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला त्यामध्ये औरंगाबादचा रहिवासी शेख मुश्ताख शेख मुनाफ हा साथीदारांसह बनावट आणि खोटे कागदपत्र तयार करून विविध खटल्यातील आरोपींचे जामीन घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा न्यायालयातून शेख मुश्ताखला अटक केली. त्याची चौकशी केली असता, हे मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद आणि मुंबई येथून इतर 10 जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ज्यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

अटक केलेल्या टोळीतील प्रत्येक जणाकडे विशेष जबाबदारी दिलेली होती. यातील काही जण दलाल म्हणून काम करत होते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून आरोपीकडून जामिनाबाबत पैसे घेतले जायचे. घेतलेली रक्कम सर्वजण वाटून घ्यायचे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड, सातबारे, रेशनकार्ड, पॅनकार्ड, कलर प्रिंटर, लामीनेशन मशीन, संगणक आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून किती गुन्हेगारांना बनावट जामिन या टोळीने दिला याबाबत पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

हेही वाचा - भाजप खासदाराच्या कार्यालयाबाहेर गोळीबार; हल्लेखोराला अटक!

Intro:बनावट कागदपत्र सादर करून आरोपींचे जमीन घेणाऱ्या टोळीचा पर्दाफार्ष औरंगाबाद गुन्हे शाखेने केला. औरंगाबाद आणि मुंबई येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली असुन 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.Body:जामीन घेण्यासाठी बनावट दस्तावेज या टोळीने तयार केले होते. जमीनदार विश्वासाचे दिसावे यासाठी आरोपी महिलांनासोबत घेऊन कुटुंब असल्याचं दाखवून विश्वास संपादन करायचे. एका जामिनासाठी पाच ते पंधरा हजार तर आरोपी पैसेवाला असेल तर 50 हजारांपर्यंत देखील पैसे घेतले जात होते.
Conclusion:औरंगाबाद गुन्हे शाखेला निनावी तक्रारदाराने याबाबत तक्रार केली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचला त्यामध्ये औरंगाबादचा रहिवासी शेख मुश्ताख शेख मुनाफ हा साथीदारांसह बनावट आणि खोटे कागदपत्र तयार करून विविध खटल्यातील आरोपींचे जामीन घेत असल्याचं समोर आलं. त्यानुसार पोलिसांनी जिल्हा न्यायालयातून शेख मुश्ताखला अटक केली. त्याची चौकशी केली असता हे मोठं रॅकेट असल्याचं उघड झाल. आरोपीने दिलेल्या माहिती नुसार औरंगाबाद आणि मुंबई येथून इतर दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली ज्यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. अटक केलेल्या टोळीतील प्रत्येक जणाकडे विशेष जबाबदारी दिलेली असल्याची काही जण एजंट म्हणून काम करायचे. गुन्ह्याच स्वरूप पाहून आरोपिकडून जमिनाबाबत पैसे घेतले जायचे. घेतलेली रक्कम सर्वजण वाटून घ्यायचे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड, सातबारे, रेशनकार्ड, पॅनकार्ड, कलर प्रिंटर, लामीनेशन मशीन, संगणक आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून किती गुन्हेगारांना बनावट जामिन या टोळीने दिला याबाबत पोलीस तपास करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
Byte - चिरंजीव प्रसाद - औरंगाबाद पोलीस आयुक्त
Last Updated : Nov 8, 2019, 2:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.