औरंगाबाद - एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना झाला आहे. तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपली चाचणी केली होती. त्यात ते कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम 'जैसे थे' ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
काही दिवसांपासून गुजरात येथे प्रचारात होते व्यस्त
इम्तियाज जलील हे गुजरात राज्यातील महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी गेले होते. प्रचार आटोपून पाच दिवसांपूर्वी ते शहरात दाखल झाले, मात्र त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जलील हे रशीदपुरा येथील खासगी रुग्णालयात दाखल झाले असून, प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. तसेच, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील जलील यांनी केले.
गेल्या काही दिवसांमध्ये बडे नेते बाधित
गेल्या काही दिवसांत राज्यातील काही बड्या नेत्यांना कोरोना झालेला आहे. यात राजेश टोपे, बच्चू कडू, जयंत पाटील, एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांचा समावेश आहे. राज्यात कोरोना उद्रेक होत असताना नागरिकांसह नेते मंडळींनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे पैठणचे नाथ मंदिर अंशत: बंद - प्रशासन