ETV Bharat / state

केबलचे काम करताना शॉक लागल्याने औरंगाबादेत कामगाराचा मृत्यू

औरंगाबाद मध्ये केबलचे काम करताना शॉक लागल्याने एका ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. डिशची केबल टाकताना शॉक लागल्याने मृत्यू.

शॉक लागल्याने औरंगाबादेत कामगाराचा मृत्यू
author img

By

Published : Aug 9, 2019, 1:32 PM IST

औरंगाबाद - शहरातील माहूनगर भागात शॉक लागल्याने एका ४२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नितीन सांडुजी शेजुळ राहणार पंचशील नगर असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

केबलचे काम करताना शॉक लागल्याने औरंगाबादेत कामगाराचा मृत्यू

नितीन शेजुळ हे विजू पाटील नावाच्या व्यक्तीकडे केबल कामाला होते. गुरुवारी दुपारी नितीन विजू आणि अजून दोन कर्मचारी असे चौघेजण डिशचे केबल टाकण्यासाठी महूनगरमध्ये गेले होते. दरम्यान अचानक तेथे स्पार्कींग झाली व शेजुळ यांना विजेचा शॉक बसला. यानंतर ते बेशुद्ध पडले त्यांना तातडीने सहकाऱ्यांनी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घरातील एकुलता एक कमवता व्यक्ती हरपल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:डिशची केबल टाकताना शॉक लागून एका 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील माहूनगर भागात घडली.
नितीन सांडुजी शेजुळ वय 42(रा.पंचशील नगर) असे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे..

Body:नितीन शेजुळ हा विजू पाटील नावाच्या व्यक्तीकडे कामाला होता. गुरुवारी दुपारी नितीन विजू आणि अजून दोन कर्मचारी असे चौघेजण डिश चे केबल टाकण्यासाठी महूनगर मध्ये गेले होते दरम्यान अचानक तेथे स्पर्किंग झाली व शेजुळ यांना विजेचा शॉक बसला या मध्ये ते बेशुद्ध पडले त्यांना तातडीने सहकाऱ्यांनी रुग्णालयात हलविले मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. घरातील एकुलता एक कमवता व्यक्ती हरपल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.