औरंगाबाद - गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात रोज 300 पेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवारी दिवसभरात 300 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मनपा आणि जिल्हा प्रशासनाने आता जास्तीत जास्त तापसणीवर भर दिला असून शहरातील वेगवेगळ्या भागात अँटीजेन तपासणी केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यास दिसून येत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या आता दहा हजारांच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 88 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 9 हजार 832 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5 हजार 636 बरे झाले, 377 जणांचा मृत्यू झाला. तर 3 हजार 819 जणांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये शहरात येणाऱ्या मार्गांवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शुक्रवारी सकाळी प्राप्त अहवालात मनपा हद्दीतील 42 नवे रुग्ण आढळून आले.
ठिकाण आणि कंसात रुग्णांची संख्या -
एनआरएच हॉस्टेल (1), बेगमपुरा (1), गारखेडा (1), केळी बाजार (1), जटवाडा (1), चैतन्य नगर, हर्सुल (1), जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ (1), पद्मपुरा (1), बन्सीलाल नगर (2),क्रांती नगर (9), राधास्वामी कॉलन, हर्सुल (1) एन अकरा (1), अयोध्या नगर (1), पवन नगर (2), शिवाजी नगर (1), अविष्कार कॉलनी (1), प्रकाश नगर (1), ठाकरे नगर (1), जय भवानी नगर (1), एन चार सिडको (2), एन आठ सिडको (1), श्रद्धा नगर (1), एन दोन राजीव गांधी नगर (1), एन तीन सिडको (1), एन सहा, सिडको (1), चिकलठाणा (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), बालाजी नगर (2), नक्षत्रवाडी (1), अन्य (1) भागातील रुग्ण आहे तर ग्रामीण भागात 40 नवे रुग्ण आढळून आले ज्यामध्ये रांजणगाव (1), फुलंब्री (4),फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री (1), टिळक नगर, कन्नड (1), बोरगाव अर्ज, फुलंब्री (1), पळसवाडी, खुलताबाद (1), शेंद्रा कामंगर(4), कुंभेफळ (4), मोठी आळी, खुलताबाद (2), चित्तेगाव (7), भवानी नगर, पैठण (1), समता नगर, गंगापूर (1), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (2),डोंगरगाव, सिल्लोड (1), पुरणवाडी, सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (1), शिवाजी नगर, सिल्लोड(1), घाटनांद्रा सिल्लोड (1), शंकर कॉलनी, वैजापूर (1), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (1), इंदिरा नगर, वैजापूर (1), अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर (1) देवगाव (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत