ETV Bharat / state

औरंगाबाद: कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद

author img

By

Published : Feb 22, 2021, 6:34 PM IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, रविवारी दोनशेपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, महापालिकेने आता कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.

Coaching classes closed
कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद

औरंगाबाद - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, रविवारी दोनशेपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, महापालिकेने आता कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. फक्त दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे कोविड नियमांचे पालन करून या वर्गांचे क्लासेस सुरू राहतील. असे आदेश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.

रुग्ण आढळल्यास कॉलनी होणार सील

एखाद्या कॉलनीत अथवा वसाहतीमध्ये 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यास तो परिसर सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच ज्या घरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून येईल, त्या घरावर स्टिकर चिटकवून, ते घर प्रतिबंधित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच रुग्णा वाढत असल्याने आता होम आयसोलेशन पर्याय बंद करून रुग्णांना केवळ इन्स्टिट्युशनल आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.

मंगल कार्यालयांवर कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र अजूनही लग्नसमारंभांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने सर्व मंगल कार्यालयांना नियम पाळण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र या नोटीसला केराची टोपली दाखवत मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे मनपाच्या नागरिक मित्र पथकाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. रविवारी दिवसभरात अनेक मंगल कार्यालय, लॉन्स, कोचिंग क्लासेस अभ्यासिका यांच्यावर कारवाई करून 92 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शहरात मास्क न घालता फिरणाऱ्या 139 जणांकडून 70 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.