ETV Bharat / state

Indurikar Maharaj : इंदुरीकर महाराजांना 'ते' वक्तव्य भोवणार, औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश - मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेत हे आदेश दिले आहेत.

Indurikar Maharaj
इंदुरीकर महाराज
author img

By

Published : Jun 16, 2023, 3:45 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सतत काही ना काही कारणाने चर्चेत असतात. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ते बरेचदा अडचणीतही सापडले आहेत. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याबाबत दिलेल्या तक्रारीनंतर न्यायालयाने सुनावणी घेत हे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण? : इंदुरीकर महाराज यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या कीर्तनातून सम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगी होते, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पण सेशन कोर्टाने गुन्हा रद्द केला होता. सेशन कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने इंदुरीकर महारांजांविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची याचिका दाखल : इंदुरीकर महाराजांच्या विधानानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. सर्व स्तरांतून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. मात्र संगमनेर जिल्हा सत्र न्यायालायने त्यांना दिलासा देताना त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला होता. या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दोन याचिका याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज (16 जून) रोजी सुनावणी झाली. इंदुरीकर महाराज यांच्या या कीर्तनाचे व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे व्हिडिओ न्यायालयात पुरावे म्हणून सादर केले होते.

हे ही वाचा :

  1. Indorikar Maharaj News : इंदुरीकर महाराजांना माध्यमांची धास्ती, कॅमेरे बंद करायला लावूनच कार्यक्रमाला केली सुरुवात
  2. इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.