ETV Bharat / state

Vishal Dhume Suspended : सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे निलंबित - Police Vishal Dhume suspended

महिलेची छेड काढल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करणयाता आला होता. जर ढुमे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर,खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद बंद करण्याचा इशारा दिला होता.

Vishal Dhume Suspended
सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे निलंबित
author img

By

Published : Jan 18, 2023, 8:30 PM IST

औरंगाबाद : एका घरात जाऊन महिलेची छेड काढल्याचा आरोप असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिलेन सिटी चौक पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत कुटुंबीयांनी इमारतीच्या पायऱ्यांवर सुरू असलेला गोंधळाबाबत सीसीटीव्ही देखील पोलिसांना सुपूर्त केले होते. घरात जाणे, महिलेची छेड काढणे असे कलम लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

ढुमे यांच्यावर कारवाईची झाली होती मागणी : सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आल्यानंतर, त्यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र महिलेची तक्रार आल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई का नाही? अशी टीका करण्यात येत होती. तक्रारदार महिला, तिचे कुटुंबियांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल, खासदार इम्तियाज जलील यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती. तर खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद बंद करण्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर विशाल ढुमे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

अस आहे प्रकरण : गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे 15 जानेवारीच्या रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. याचवेळी त्यांच्या पीडित महिला आपल्या आपल्या पती आणि मुलीसह तिथे आली होती. त्यामुळे महिलेच्या पतीची आणि विशाल ढूमे या दोघांची भेट झाली. मात्र याचवेळी आपल्याकडे गाडी नसल्याने मला लिफ्ट मिळेल का, अशी विनंती विशाल ढुमे यांनी आपल्या मित्राला केली. त्यामुळे मित्राने देखील होकार दिला आणि त्यांना आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर विशाल ढुमे यांनी छेड काढण्यात सुरुवात केली होती. असा आरोप महिलेच्या वतीने करण्यात आला होता.

अशी होती तक्रार : मित्र आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर, ढुमे मागच्या सीटवर बसले होते. दरम्यान गाडीत बसताच दारूच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी गाडीतच महिलेची छेड काढायला सुरुवात केली. महिलेच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आल्यावर मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला, अशी पुन्हा मित्राला विनंती केली. तर, घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. त्यावेळी वाद घालून महिलेच्या पतीला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता.

सीसीटिव्ही आले समोर : महिलेने तक्रार देत असताना सदर घटनेचा सीसीटीव्ही पोलिसांना देण्यात आला होता. या सीसीटीव्हीमध्ये नारळी भाग परिसरात असलेल्या इमारतीत सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे हे पायऱ्यांवर उभे आहेत. त्यामध्ये महिला आणि दोन व्यक्ती त्यांच्याशी बोलत असून त्यांच्यात वाद सुरू असल्याचं यामध्ये स्पष्ट दिसत आहे. तर विशाल ढुमे यांनी नागरिकांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.