छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भागात विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात टाळ मृदंगाच्या गजरात भक्तांनी लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही यात्रा भरत आहे. आठ ते दहा लाख भाविक नित्यनेमाने दर्शन घेतात. यंदा 200 हून अधिक दिंड्यांचा सहभाग पाहायला मिळाला. लाखो वारकरी पावली खेळत टाळ मृदंगाच्या गजरात पंढरपूर परिसरात दाखल झाले. त्यावेळी तेथील मुस्लिम बांधवांनी देखील या सोहळ्यात सहभाग घेऊन वारकऱ्यांचे स्वागत केले. तर दुसरीकडे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी देखील वारकऱ्यांसोबत एकरूप होत रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आहे.
वारीत सहभागी होऊन जपली सामाजिक बांधिलकी : टाळ वाजवत, देवाचे नामस्मरण करत पोलीसही सर्वसामान्यांसोबत आहेत, असा विश्वास त्यांनी निर्माण केला. काही अडचण असेल तर तातडीने पोलिसांना कळवा, अशी जनजागृती या निमित्ताने पोलिसांनी केली. एकीकडे गणवेशातील पोलीस वारीत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत होते, तर दुसरीकडे गणेवश न घालता आपले कर्तव्य बजावत होते. आषाढी एकादशीला चोरीच्या उद्देशाने किंवा महिलांना त्रास देण्याच्या उद्देशाने आलेल्या 48 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
साध्या वेशात केली कामगिरी : पंढरपूर परिसरात लाखो वारकऱ्यांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी पोलीसही सोहळ्यात एकरूप झाले होते. मात्र, दुसरीकडे त्यांनी साध्या विषयात आपले कर्तव्य चोख बजावल्याचे पाहायला मिळाले. गर्दीच्या ठिकाणी चोरटे नेहमीच तक लावून असतात तर काही ठिकाणी मुलींची छेड काढण्याचे देखील प्रकार होत असतात. मात्र अशा चोरांना प्रतिबंध घालण्यासाठी 40 पोलीस अधिकारी कर्मचारी साध्या वेशात आपले कर्तव्य बजावत होते.
हेही वाचा :
- Ashadhi Ekadashi : अब्दुल पटेलांनी वाचवले आत्तापर्यंत 35 वारकऱ्यांचे प्राण, आषाढी एकादशी निमित्त विनामूल्य सेवा
- Ashadi Ekadashi 2023 : हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन; जिल्ह्यात बकरी ईदचा उत्साह, जिल्ह्यात एकादशीला कुर्बानी देणार नाही
- Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी, विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीची वारी; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व